बाबो! लग्नाच्या मंडपातच नवरीला झाल्या उलट्या; पतीने दवाखान्यात नेताच, झालं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 13:39 IST2020-07-06T13:20:42+5:302020-07-06T13:39:07+5:30

आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटात लग्नादरम्यान प्रियकर नवरीला घेऊन जातो किंवा काहीतरी अनपेक्षित घडतं. अशा अनेक घटना पाहिल्या असतील. सिनेमात नाही तर खऱ्याखुऱ्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक घटना घडतात. कर्नाटकातील बेंगलुरूमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे.

ज्यामुळे तुमची झोपच उडेल. लग्नानंतर लगेचच नवरीने उलटया करायला सुरूवात केली. त्यामुळे पतीने तिला दवाखान्यात नेलं. इतकंच नाही तर लग्नानंतर त्या मुलीला प्रेग्नेंसी टेस्ट आणि वर्जिनिटी टेस्टचा सुद्धा सामना करावा लागला.

त्यातून असं दिसून आलं की, या मुलीला गैस्ट्राइटिस म्हणजेच पोटाचा आजार होता. संशय घेतल्यामुळे तसंच त्रास दिल्याप्रकरणी मुलीने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पतीने हे आरोप फेटाळत घटस्फोटाची मागणी केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील मेट्रोमोनिल साईट्सवरून २९ वर्षीय शरद आणि २६ वर्षिय रक्षा यांचे लग्न ठरवण्यात आलं होतं. हे दोघंही एमबीए ग्रॅजुएट आहेत. बराच वेळ सोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर १५ दिवस आधी रक्षाच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर रक्षा डिप्रेशनमध्ये गेली. रक्षाच्या अशा अवस्थेमुळे शरद या लग्नामुळे आनंदी नव्हता. यादरम्यान रक्षाचा आपल्या मित्रांशी संपर्क होत होता. त्यावेळीच शरदच्या मनात संशय आला.

गैस्ट्राइटिसमुळे रक्षाला उलट्या झाल्या. त्यानंतर शरदने रक्षाला रुग्णालयात नेले. तिला सुरूवातीला वाटले की, शरदने पोटाच्या आजारासाठी तिला दवाखान्यात आणलं आहे. पण डॉक्टरांनी वर्जिनिटी टेस्ट आणि प्रेंग्नंसी टेस्टबद्दल सांगताच तीला खूप मोठा धक्का बसला.

टेस्ट केल्यानंतर रक्षाने पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. काऊंसिलर अपर्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षाने सांगितले की, तिला न विचारता वर्जिनिटी टेस्ट आणि प्रेग्नेंसी टेस्ट करण्यात आली. टेस्टची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर तिला याबाबत कळले. सध्या या दोघांची केस कोर्टात सुरू आहे.


















