काही मिनिटांमध्ये विकले गेले Nike चे हे लिमिटेड एडिशन शूज, किंमत वाचून उडेल तुमची झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:47 IST2019-10-10T16:44:37+5:302019-10-10T16:47:38+5:30

लोकप्रिय फॅशन ब्रॅन्ड Nike एक स्पेशन एडिशन शूज लॉन्च केले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे पटापट विकले जात आहे. असे सांगितले जात आहे की, हे शूज बाजारातून काही मिनिटांमध्येच Sold Out झाले. पण या शूजची किंमत तुमची झोप उडवणारीच आहे. कारण या शूजची किंमत ३००० डॉलर म्हणजे २ लाख रूपये इतकी आहे. मंगळवारी या शूजची विक्री सुरू झाली होती आणि या शूजचं नाव 'Jesus Shoes' असं ठेवण्यात आलं आहे.
या शूज हे नाव देण्याचं एक खास कारणही सांगितलं जातं. असे सांगितले जात आहे की, पहिल्यांदाच एका शूजमध्ये Holy Water म्हणजे पवित्र पाणी भरलेलं आहे. या शूजमध्ये जॉर्डन नदीतील पवित्र पाणी इंजेक्ट करण्यात आलं आहे.
शूजचा फोटो लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला शूजच्या सोलात नदीचं पाणी भरलेलं दिसतं. त्यामुळेच या शूजला जीजस शूज असं नाव देण्यात आलं आहे.
मान्यतांनुसार, येशू ख्रिस्तहे जॉर्डन नदीच्या पाण्यावरच चालले होते. तसेच शूजच्या वरच्या किनाऱ्यावर रक्ताच्या एका थेंबासारखी आकृती देखील काढली आहे. हे येशू ख्रिस्ताचं प्रतिक म्हणून दाखवण्यात आलं आहे. तसेच शूजच्या लेसवर क्रॉसही लावण्यात आला आहे.
रिपोर्ट्सनुसार, शूजचं कव्हरही खास डिझाइन करण्यात आलं आहे. न्यूयॉर्क पोस्टला कंपनीचे हेड ऑफ कॉमर्स डेनिअल ग्रीनबर्ग यांनी सांगितले की, 'आम्ही या कॉन्सेप्टसोबत काही मोजकेच शूज तयार केले होते. कंपनी सध्या असे शूज तयार करत नाहीये'. तर ब्रॅन्डचे फाऊंडर गॅब्रियन वेले म्हणाले की, भविष्यात अशा शूजची सेकंड इनिंग येऊ शकते.