Indian Currency Note : कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 02:10 PM2023-02-26T14:10:31+5:302023-02-26T14:14:21+5:30

Indian Currency Note : प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर कागदाच्या वापराने बनावट नोटा बनवण्याचे काम करतो. पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही.

Currency Note In India: भारत हळु-हळू डिजिटायझेशनकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत लोक क्वचितच रोख चलनाचा वापर करत आहेत. परंतु अनेक ठिकाणी रोख रकमेचीच गरज असते. या चलनाच्या नोटेचे फार महत्व आहे.

अनेकांना प्रश्न असेल की, या नोटा कोणत्या कागदापासून बनवल्या जातात, तर यासाठी कागदाचा वापर होत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण यात कागद नाही तर दुसऱ्याच वस्तुचा वापर केला जातो.

काही दिवसांपूर्वी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे. या वेब सीरिजमध्ये मुख्य पात्र (शाहिद कपूर) बनावट नोटा बनवण्याचे काम करत असतो. यासाठी तो कागदाचा वापर करतो, पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही.

सध्या भारतात 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 च्या नोटा चलनात आहेत. या नोटा तयार करण्यासाठी कागदाचा वापर केला जात नाही. नोटा कागदाच्या बनवल्या तर त्या ओल्या होऊन खराब होतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून येणारे चलन कागदाऐवजी कापसापासून बनवले जाते.

कापसापासून बनवलेल्या नोटांना कागदापेक्षा जास्त आयुष्य असते. तुम्हीही विचारात पडला असाल की, कापसाचा वापर कसा होतो..? RBI च्या अधिकृत वेबसाईटवर बघितले तर कळते की, नोटा बनवण्यासाठी 100 टक्के कापूस वापरला जातो. कापसापासून बनवलेली नोट कागदापेक्षाही मजबूत असते.

भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही कापसापासून नोटा बनवल्या जातात. नोटा कागदाच्या बनवल्या जातात असे अनेकांना वाटते, त्यामुळे आता हा गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका. लेनिन नावाचा फायबर कापसात आढळतो आणि त्याच्या मदतीने नोटा तयार केल्या जातात.

गॅटलिन आणि अॅडहेसिव्ह सोल्युशन हे कॉटन तंतूमध्ये असलेल्या लेनिनमध्ये मिसळले जाते, ज्यामुळे नोटा जास्त काळ टिकतात. नोटा बनवताना अनेक प्रकारच्या सिक्युरिटी फीचर्सचा वापर केला जातो जेणेकरुन कोणीही बनावट नोटा बनवून लोकांची फसवणूक करू शकत नाहीत.