आयलॅंड खरेदी करण्यासाठी आणि स्वत:चा देश बनवण्यासाठी किती पैसे लागतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:32 PM2023-03-08T16:32:03+5:302023-03-08T16:46:25+5:30

How to make new country: जगातल्या इतर श्रीमंत लोकांप्रमाणे भारतातीलही काही लोकांकडे पर्सनल आयलॅंड आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात काही मोठ्या बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.

How to make new country: यूरोपीयन मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातल्या वेगवेगळ्या भागात आयलॅंड म्हणजेच बेट खरेदी करण्याचं चलन आहे. आयलॅंड खरेदी करणं एक सामान्य बाब आहे. यांची किंमत तेवढीही जास्त नसते जेवढा आपण विचार करतो. अनेकदा तर काही आयलॅंड 1 लाख डॉलर म्हणजे 1 कोटी रूपयांमध्येही मिळतात. अनेक श्रीमंत लोकांना सुट्टी घालवण्यासाठी शांत आणि वेगळं ठिकाण हवं असतं. त्यामुळे ते खाजगी आयलॅंड खरेदी करतात. अशात हा प्रश्न उपस्थित होतो की, वादग्रस्त धर्मगुरू नित्यानंद प्रमाणे कुणी आपला देश बनवू शकतं का?

जगातल्या इतर श्रीमंत लोकांप्रमाणे भारतातीलही काही लोकांकडे पर्सनल आयलॅंड आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात काही मोठ्या बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते आयलॅंड खरेदी करू शकतात. इतकंच नाही तर भाड्यानेही घेऊ शकतात.

आयलॅंडची किंमत लोकेशननुसार ठरत असते. सेंट्रल अमेरिकेत स्वस्तात आयलॅंड मिळतात तर यूरोपमध्ये भाव जास्त असतात. लंडनमध्ये एका आयलॅंडची किंमत सरासरी साडेसात लाख डॉलर म्हणजे साधारण 5 कोटी 35 लाख रूपये इतकी असते. तर इतर काही भागातील आयलॅंडची किंमत 7 कोटी रूपयांपासून सुरू होते. जगातल्या काही भागात तर आयलॅंडच्या सेलवर बोली लागते.

छोटं आयलॅंड खरेदी करणं आणि आपला देश बनवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यासाठी इंटरनॅशनल लॉ चे काही नियम पाळायचे असतात. यानंतरही जर काही शंका असेल तर क्लेम केल्या जाणाऱ्या जमिनीला मान्यता मिळत नाही. वेगळा देश बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे देशाची सीमा. म्हणजे कोणता देश कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो याचा पुरावा हवा.

अनेकदा छोटे देश एकमेकांना मान्यता देतात जेणेकरून त्यांच्यातील देवाण-घेवाण व्हावी. पण मुख्य म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची मान्यता मिळणं. यानंतर लोकांच्या भल्यासाठी वर्ल्ड बॅंकसारख्या संस्थांकडून लोन घेण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला तुमच्या देशाचा एखादा अजेंडा मांडायचा असेल तर संयुक्त राष्ट्र संघाकडे आपलं म्हणणं पोहोचवणं मोठं काम आहे.

संयुक्त राष्ट्र संघाची मान्यता मिळवण्यासाठी काही नियम आहेत. यासाठी यूएनच्या सेक्रेटरी जनरल यांना यासंबंधी एक लेटर लिहावं लागतं. तेव्हा यूएन चार्टरमध्ये एखादा देश असण्याबात मुद्दा उठवला होता. ज्यात तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की, तुम्ही वेगळा देश का आणि कसे आहात? अर्थातच हे सगळं करणं सगळ्यांना जमतं असं नाही. त्याशिवाय काही टेक्निकलही बाबी असतात.