श्रीमंतांचे अजब शौक; कुणी घेतलं आयलंड तर कुणी शहर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 01:21 PM2018-10-25T13:21:50+5:302018-10-25T13:31:38+5:30

श्रीमंत लोकांची बातच काही और असते हे काही वेगळं सांगायला नको. काही लोकांकडे इतका पैसा असतो की, काहीना काही खरेदी करण्याची वेगवेगळे पर्याय ते शोधून काढतातच. अशाच ५ श्रीमंत लोकांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी हे दाखवून दिलं की, त्यांच्यासाठी कोणताही खर्च मोठा नाहीये. या यादीतील लोकांनी आपले शौक पूर्ण करण्यासाठी आयलंड काय तर शहर सुद्धा विकत घेतलं आहे.

२०१४ मध्ये बिलेनियर हेज फंड मॅनेजर स्टीव कोहनने १४ फूट लांब संरक्षित ठेवलेली शार्क ८० लाख ते १.२० कोटी डॉलर इतक्यात विकत घेतली होती. २००७ मध्ये अभिनेत्रा निकोलस केजने मंगोलियन डायनॉसॉरचं डोकं २, ७६, ००० डॉलरमध्ये विकत घेत लिओनार्डो डी कॅप्रियोला मागे सोडलं होतं.

श्रीमंताना आयलंड खरेदी करणे फार पसंत आहे. २०१२ मध्ये ओरेकलचे फाऊंडर लॅरी एलिसनने हवाईमध्ये एका व्दीपाचा ९७ टक्के भाग ३० कोटी डॉलरला खरेदी केला होता. वर्जिन ग्रुपचे फाऊंडर रिचर्ज ब्रेनसनमे १९७९ मध्ये ब्रिटिश वर्जिन आयलॅंड्स नेकर आयलंड खरेदी करण्यासाठी ३,२०,००० डॉलर खर्च केले होते.

श्रीमंत लोकांना कशाची आवड असेल काही सांगता येत नाही. २०१३ मध्ये एलन मस्कने जेम्स बॉन्ड सीरिजमधील 'द स्पाय हू लव्ड मी' सिनेमात वापरलेली लोटस कार ८,८६,००० डॉलरमध्ये विकत घेतली होती.

श्रीमंताना प्रायवेट जेटही फार पसंत आहेतय सौदी अरबचा प्रिन्स अलवदील बिन तलालने द फ्लाईंग पॅलेस नावाचं डबल-डेकर सुपरजंबो जेट ३१.९ कोटी डॉलरला खरेदी केलं होतं. पण त्यांनी नंतर ते एका अज्ञात व्यक्तीला विकलं होतं. तर अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजॉसने गल्फस्ट्रीम G650ER प्रायवेट जेट ६.५ कोटी डॉलरला खरेदी केलं होतं.

हॉलिवूड अभिनेत्री किम बेसिंगरने १९८९ मध्ये जॉर्जियामध्ये २ हजार एकरमध्ये पसरलेलं ब्रेसलटन शहराचा १,७५१ एकर भार एका दुसऱ्या इन्व्हेस्टरसोबत मिळून २ कोटी डॉलरला खरेदी केला होता. पण नंतर याचा लिलाव करावा लागला होता.