विद्यापीठात महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा Porn Video पाहून टाईमपास; बिंग फुटताच 5 जणांची नोकरी गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:28 PM2021-03-25T12:28:09+5:302021-03-25T12:50:48+5:30

जीवाजी यूनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या विभागातील साधारण ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी एका महिन्यात १२५६ मिनिटे पॉर्न वेबसाइटचा वापर केला.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील जीवाजी यूनिव्हर्सिटीच्या ६ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यातील ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि एकाला नोटीस जारी करण्यात आली आहे. हे कर्मचारी ऑफिसमधील कॉम्प्युटरवर १२५६ मिनिटे पॉर्न व्हिडीओ बघत असल्याचा खुलासा झाल्यावर ही कारवाई करण्यात आली.

जीवाजी यूनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या विभागातील साधारण ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी एका महिन्यात १२५६ मिनिटे पॉर्न वेबसाइटचा वापर केला आणि आठ यूजर आयडीच्या माध्यमातून पॉर्न व्हिडीओ पाहिले. या कर्मचाऱ्यांमध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, पॉर्न साइट बघणाऱ्यांमध्ये नियमित आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यूनिव्हर्सिटी प्रबंधनला माहिती मिळताच कुलपतींनी मिटींग बोलवली. चौकशीतून ही घटना घडल्याचं सत्य समोर आलं.

या कर्मचाऱ्यांनी यूनिव्हर्सिटीचं नेटवर्क वापरून पॉर्न साइटवर व्हिडीओ पाहिले आहेत. ही घटना समोर आल्यानंतर ४ सर्विस प्रोव्हायडर कर्मचारी आणि एका फॅकल्टीची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तेच एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्यात २ महिलांचाही समावेश आहे. ज्या आठ यूजर आयडीवरून पॉर्न व्हिडीओ बघितले गेले. त्यात असे कर्मचारी आहेत ज्यांचं वय जवळपास ५८ आहे. आणि ते रिटायर होणार आहेत.

काही कर्मचाऱ्यांनी आपली बाजूही मांडली की, ते दुसरी वेबसाइट सर्च करत होते, पण पॉर्न वेबसाइट आपोआप उघडत होत्या. बुधवारी या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात दोन महिलांसहीत पाच कर्मचाऱ्यांना सेवेतून काढलं आहे.

ही घटना समोर आल्यावर जीवाजी यूनिव्हर्सिटीमध्ये एकच खळबळ उडाली. सांगितले गेले की, कर्मचारी तोंड लपवत फिरत होते. त्यांच्यावर असाही आरोप आहे की, त्यांनी यूनिव्हर्सिटीची इमेज डॅमेज केली आहे.

दरम्यान ग्वाल्हेरमधून दोन वर्षाआधी अशीच एक घटना समोर आली होती. त्यावेळी ग्वाल्हेर कलेक्टर ऑफिसमध्ये कर्मचारी पॉर्न बघताना पकडण्यात आला होता. त्यावेळीही चांगलाच गोंधळ झाला होता.