मातीने भरलेला ट्रक खाली करताच पडले सोन्याचे शिक्के; अन् लोकांना कळताच घडलं असं काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 01:00 PM2020-11-18T13:00:07+5:302020-11-18T13:11:16+5:30

उत्तर प्रदेशातील शामली जनपदमधील एका शेतकऱ्याला खोदकाम करताना सोन्या चांदीचे शिक्के सापडले आहेत. हे प्राचीनकाळातील शिक्के आहेत. रविवारी मातीने भरलेल ट्रॅक रिकामा करताना हे शिक्के सापडले. ही घटना कळताच ग्रामीण भागातील लोक त्या ठिकाणी गोळा झाले.

ग्रामीण भागातील लोकांना जसं शेतात शिक्के सापडल्याची सुचना मिळाली तसे मोठ्या संख्येने लोक शेतात जमा झाले. जे हातात मिळालं ते घेऊन लोकांनी पळायला सुरूवात केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे पोलिसांनी विचारणा केल्यानंतर लोकांनी आपण शिक्के उचलले नसल्याचे सांगतले.

सूचना मिळाल्यानंतर जेव्हा पोलिस शेतात पोहोचले तेव्हा ग्रामीण भागातील लोकांनी शिक्के घेण्याबाबत काहीही सांगितले नाही. पण माध्यमांना तीन शिक्क्यांचा फोटो मिळाला आहे. ज्यात दोन सोन्याचे आणि एक शिक्का चांदीचा आहे. चांदीच्या शिक्क्यावर अरबी भाषेत रहमतुल्ला ईब्ने मोहाम्मद आणि सोन्याच्या शिक्क्यावर दुसरा कलमा लिहिला आहे.

शेत मालक ओम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील किती शिक्के चांदीचे आणि किती सोन्याचे आहेत याबाबत माहिती मिळालेली नाही.

ग्रामप्रधान राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हे शिक्के पाहिलेले सुद्धा नाहीत. एडीएम अरविंद सिंह यांनी सांगितले की, खोदकामादरम्यान धातूच्या काही वस्तू मिळाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली आहे.