बाबो! अनोळखी समजून दोन तरूणांसोबत ठेवले संबंध, सत्य समोर आल्यावर झाली बोलती बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 02:25 PM2021-04-20T14:25:18+5:302021-04-20T14:44:55+5:30

'द सन'च्या रिपोर्टनुसार, तरूणीने सांगितले की, यातील जास्तीत जास्त तरूणांसोबत केवळ बातचीत होत होती आणि यातील सहा तरूणांसोबत तिने संबंध ठेवले होते.

आपल्या एक्स बॉयफ्रेन्डससोबतचं नातं संपल्यावर २६ वर्षीय एका तरूणीने केवळ आनंदासाठी दोन तरूणांसोबत शरीरसंबंध ठेवणे सुरू केले. नंतर जेव्हा तिला या दोन्ही तरूणांबाबतचं सत्य समजलं तेव्हा ती हैराण झाली. तरूणीला वाटलं होतं की, दोन्ही तरूण एकमेकांना ओळखत नसतील.

पण सत्य काही वेगळंच निघालं. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी नाही तर ते मित्र होते. तरूणीने सांगितले की, ब्रेकअप झाल्यानंतर ती मुलांसोबत नात्याबाबत फार गंभीर कधी नव्हती. गेल्या काही दिवसांपासून ती १० वेगवेगळ्या तरूणांना भेटत होती.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, तरूणीने सांगितले की, यातील जास्तीत जास्त तरूणांसोबत केवळ बातचीत होत होती आणि यातील सहा तरूणांसोबत तिने संबंध ठेवले होते.

तिने पुढे सांगितले की, यातील एका तरूणाचं वय २८ वर्षे आहे. तो दिसायला चांगला आहे आणि चांगल्या परिवारातील आहे.

ती म्हणाली की, तिला या तरूणासोबतच्या रिलेशनशिपमध्ये फारसं आकर्षण नव्हतं. तरी सुद्धा ती त्याला डेट करत होती आणि त्याच्यासोबत संबंध ठेवत होती. त्याने तिला एकदा सांगितले होते की, तो तेथील स्थानिक टीमचा फुटबॉल प्लेअर आहे.

तरूणीने सांगितले की, दुसऱ्या तरूणाला तिने चार वेळा डेट केलं होतं. हा तरूण तीस वर्षाचा आहे. तिने पुढे सांगितले की, या तरूणासोबत तिन दोनदा शरीरसंबंध ठेवले. आणि गेल्यावेळी तिने तिच्या वीकेंडचा जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवला.

ती म्हणाली की, 'मला असं वाटतं हा तरूण माझ्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. पण एके सकाळी कॉफी पिताना त्याने सांगितले की, तो सुद्धा स्थानिक फुटबॉल टीमचा खेळाडू आहे.

हे ऐकून मी हैराण झाले. मी ज्या मुलासोबत संबंध ठेवले होते. त्याला हा तरूण ओळखत होता. याने त्या तरूणाचं नावही सांगितलं आणि म्हणाला आम्ही मित्र आहोत'.

तरूणी म्हणाली की, आता तो मुलगा डेटसाठी तिला मेसेज करत आहे. पण सत्य जाणून घेतल्यावर मी परेशान आहे. मला हा विचार येतोय की, जेव्हा दोघांना तिच्याबाबत समजेल तर ते दोघे एकमेकांशी काय बोलतील.

ती म्हणाली की 'मला माहीत आहे की, मी काही चुकीचं केलं नाही. पण काय मी त्यांना सांगितलं पाहिजे की, मी दोघांनाही ओळखते. हे मला कळत नाहीये'.