भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशी नागरिक मोजताहेत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:26 PM2018-11-20T20:26:43+5:302018-11-20T20:42:39+5:30

भारतातील विवाह सोहळ्यांचा थाट काही औरच असतो. आता तर भारतीय विवाह सोहळ्यांची भुरळ परदेशी नागरिकांनाही पडू लागली आहे.

त्यामुळे अनेक परदेशी नागरिका भारतीय विवाह सोहळ्यांमधील थाटमाट पाहण्यासाठी या विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत.

भारतीय विवाह सोहळ्यात सहभागी होऊन अस्सल भारतीय पेहराव परिधान करण्याची क्रेझ या परदेशी नागरिकांमध्येही दिसून येत आहे.

भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी काही परदेशी नागरिक तर पैसेही मोजत आहेत.

परदेशी नागरिकांना भारतीय विवाह सोहळ्याबाबत वाटत असलेल्या आकर्षणामुळे भारतात वेडिंग टुरिझम आकारास येत आहे.

जॉइन माय वेडिंग सारख्या साईट्सवरून भारतीय जो़डप्यांना परदेशी नागरिकांना आपल्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याची संधी मिळत आहे.

जयपूर, दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये वेडिंग टुरिझम वेगाने वाढत आहे.

एका दिवसाच्या वेडिंग टुरिझमच्या पॅकेजसाठी सुमारे १० हजार ५०० रुपयांपर्यंत रक्क मोजावी लागते.