बापरे! १ वर्षापासून चिमुरड्याच्या पोटात दुखतं होतं; अन् ऑपरेशन केल्यावर बाहेर आली ३ फूट लांब गाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 11:27 AM2020-11-22T11:27:33+5:302020-11-22T11:55:06+5:30

एका ५ वर्षांच्या लहान मुलाला गेल्या वर्षभरापासून पोटात वेदना होत होत्या. डॉक्टरांकडून वेळीच उपचार घेतले असतेल तर त्याला समस्येचा सामना करावा लागला नसता. पोटदुखीच्या वेदना कमी होत नसल्याचे या मुलाची शारीरिक स्थिती दिवसेंदिवस खालावत होती.

जेव्हा या मुलाचे ऑपरेशन करण्यात आले. तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. तुमचा विश्वास बसणार नाही पण या मुलाच्या पोटातून जवळपास ३ फूट लांब एक गाठ बाहेर काढण्यात आली. ही घटना राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील आहे.

बूंदी जिल्ह्यातील हिंडोलीमध्ये वास्तव्यास असलेल्या या पाच वर्षाच्या मुलाला एक वर्षापासून पोट दुखीचा त्रास होता. अनेकदा डॉक्टारांना दाखवून औषध गोळ्या घेऊनही फरक पडला नव्हता. त्यामुळे त्याची शारीरिक स्थिती खूप खालावली होती.

या मुलाच्या वडिलांनी बूंदीमधील डॉक्टर वीएन माहेश्वरी यांना दाखवले. त्यांनी तपासणीदरम्यान सांगितले की, पोटात गाठ दिसून आली आहे. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ शिशु शल्य चिकित्सक डॉक्‍टर समीर मेहता यांच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला.

डॉक्टर समीर यांनी लहान मुलाचे ऑपरेशन केले तेव्हा ते हैराण झाले. कारण अन्न नलिकेतून सापाप्रमाणे दिसणारी तब्बल ३ फूट लांब गाठ बाहेर आली. (Image Credit- Imagine MD, daily mail)