सापाचं विष कोणत्या रंगाचं असतं? तुम्हालाही माहीत नसेल या प्रश्नाचं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:00 IST2025-04-10T14:38:06+5:302025-04-10T15:00:41+5:30

Snake Vemon Color : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, सापाचं विष हे निळ्या रंगांचं असतं. कारण सापानं दंश मारल्यावर व्यक्तीच्या दंश मारलेल्या त्वचेचा रंग निळा होतो. पण सत्य वेगळंच आहे.

Snake Vemon Color : सापाच्या विषामुळे काही सेकंदात व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. पण जगात विषारी साप कमी आणि बिनविषारी साप जास्तीत जास्त आहेत. सापांबाबतच्या अनेक गोष्टी नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, सापाचं विष हे निळ्या रंगांचं असतं. कारण सापानं दंश मारल्यावर व्यक्तीच्या दंश मारलेल्या त्वचेचा रंग निळा होतो. पण सत्य वेगळंच आहे. अशात सापाचं विष कोणत्या रंगाचं असतं हे जाणून घेऊया.

साप एक असा जीव आहे ज्याचा विषय निघताच अनेकांना घाम फुटतो. या लोकांना दर दुरूनच साप दिसला तर काय होईल विचारायला नको. सापांबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेकांना हे माहीत नसतं की, सापाला आपल्यापेक्षा जास्त भीती वाटत असते. ते नेहमीच धोक्याची चाहूल लागताच लपण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण लोक त्यांचा जीव घेतात. जोपर्यंत तुम्ही त्यांची छेड काढत नाही तोपर्यंत साप तुम्हाला काहीही करणार नाही.

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, सापाचं विष हे निळ्या रंगाचं असतं. कारण व्यक्तीच्या ज्या भागावर सापानं दंश मारलेला असतो ती त्वचा निळी किंवा काळी पडते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की, सापांच्या विषाचा रंग निळा असतो. जास्तीत जास्त सापांच्या विषाचा रंग पारदर्शी किंवा हलका पिवळा असतो. विषारी प्रोटीन, एंझाइम्स आणि इतर तत्व शरीरातील पेशींचं नुकसान करतात. ज्यामुळे सूज, वेदना आणि रंगात बदल होतो.

सापाच्या विषाचा रंग ठीकपणे तेव्हाच दिसतो जेव्हा ते काचेच्या बरणीत किंवा भांड्यात टाकला जातो. केवळ सापाला बघून किंवा इतर मार्गानं त्याच्या विषाचा रंग सांगता येणं अवघड आहे.

जास्तीत जास्त सापांच्या विषाचा रंग पिवळा किंवा हलका पिवळा असतो. काही साप असेही असतात ज्यांच्या विषाचा रंग पांढरा तर काही सापांच्या विषाचा रंग हलका हिरवा असतो.

वैज्ञानिकांनुसार सापांच्या विषाचा रंग या गोष्टीवर अवलंबून असतो की, त्यात एल-अमीनो अॅसिड ऑक्सीडेजचं प्रमाण किती आहे. हे एक खासप्रकारचं एंझाइम आहे जे विषाच्या रंगाला प्रभावित करतं.

वैज्ञानिकांनुसार सापांच्या विषाचा रंग या गोष्टीवर अवलंबून असतो की, त्यात एल-अमीनो अॅसिड ऑक्सीडेजचं प्रमाण किती आहे. हे एक खासप्रकारचं एंझाइम आहे जे विषाच्या रंगाला प्रभावित करतं.