'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 06:50 PM2020-08-25T18:50:43+5:302020-08-25T19:01:34+5:30

जगात आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आईचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असतं. इतिहासात आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आईनं मोठी कसरत केल्याच्या अनेक घटना आहेत. अशीच एक थरारक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही घटना मध्यप्रदेशातील आहे.

रस्त्यावर एका गाईचे वासरू कारखाली सापडले. त्यामुळे शरीराचा अर्धा भाग गाडी खाली गेला. गाईकडून आपल्या वासराची अशी स्थिती पाहिली गेली नाही. त्यानंतर गाईनं गाडीच्या चारही बाजूंनी फेऱ्या मारायला सुरूवात केली. आपल्या वासराला वाचवण्याची धडपड गाईची सुरू होती.

अस्वस्थ गाईला फेऱ्या मारताना पाहून लोकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. गाईच्या वासराला वाचवण्यासाठी त्यांनी कारवर उचलून धरली. जमलेल्या बाकिच्या लोकांनी गाईच्या वासराची मान वर काढत जीव वाचवला. सोशल मीडियावर बचावकार्य करत असलेल्या माणसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चुकीच्या बाजूनं भरधाव वेगानं कार आली. त्यानंतर गाईचं वासरू या गाडी खाली सापडलं. रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत गाईच्या वासराला सुखरूपपणे बाहेर काढलं.

या सहा महिन्यांच्या वासराला सौम्य दुखापत झाली आहे. या घटनेनंतर चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवत असलेल्यांवर कारवाई का होत नाही. याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.