पबजीची अशीही क्रेझ; जोडप्याचं जबरदस्त प्री-वेडिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:47 PM2018-12-26T20:47:32+5:302018-12-26T20:52:10+5:30

सध्या अॅक्शन गेम पबजीनं सर्व धुमाकूळ घातला आहे. अनेक तरुण तरुणींना या गेमनं अक्षरश: वेड लावलं आहे. त्यामुळेच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या एका जोडप्यानं चक्क पबजी स्टाईल फोटोशूट केलं आहे.

फोटोग्राफर हर्ष साळवीनं केलेल्या फोटोसेशनची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

सोनाली बोंबले आणि आकाश जैन यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटला सध्या फेसबुकवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

सध्या तरुणाईत पबजीची प्रचंड क्रेझ असल्यानं दोघांनी पबजी स्टाईल फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला.

उत्तम फोटोग्राफी आणि जबरदस्त एडिटींगमुळे हे फोटो अतिशय लक्षवधी ठरले आहेत.

आकाश आणि सोनालीच्या या अनोख्या फोटोशूटचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यानं सगळीकडे प्री वेडिंग फोटोशूट पाहायला मिळतं आहे. मात्र त्यात हे हटके फोटोशूट अनेकांच्या पसंतीला उतरलं आहे.

तरुणाईत पबजीची क्रेझ किती वाढली आहे, ते या फोटोशूटमुळे दिसून आलं आहे.