Coronavirus : क्वारंटाईनमध्ये अनोळखी लोक ठेवत आहेत शारीरिक संबंध; सरकारने रूमबाहेर वाढवले गार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:56 AM2020-04-16T10:56:27+5:302020-04-16T11:23:19+5:30

लोक क्वारंटाईन सेंटरमध्ये भेटत असलेल्या लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवत आहेत. ते एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात आहेत.

जगभरात सुरू असलेलं कोरोना व्हायरसचं थैंमान थांबायचं नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दशकांमधील ही सर्वात भयंकर महामारी मानली जात आह. कोरोनापासून बचावासाठी जास्तीत जास्त देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम लागू करण्यात आले आहेत. पण आफ्रिकन देश युगांडामध्ये एक वेगळाच ट्रेन्ड बघायला मिळत आहे. (सांकेतिक छायाचित्र)

युगांडा आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला आहे की, सरकारी क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांनी एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या थैमानात मंत्रालयासाठी ही एक वेगळीच समस्या बनत आहे.

युगांडाचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव डियाना अटविने यांनी रेडिओवर मुलाखतीत सांगितले की, त्यांना सर्वात जास्त या गोष्टीची चिंता आहे की, लोक असेच शारीरिक संबंध ठेवत राहिले तर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाईल.

ते म्हणाले की, लोक क्वारंटाईन सेंटरमध्ये भेटत असलेल्या लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवत आहेत. ते एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जात आहेत. याने कोरोना व्हायरसचं संक्रमण आणखी पसरेल. (सांकेतिक छायाचित्र)

ते म्हणाले की, युगांडाचे नागरिक कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत अजूनही गंभीर नाहीत. क्वारंटाईनमध्ये राहणाऱ्या काही लोकांचं सेक्शुअल अफेअर सुरू आहेत. ते नियम मोडून एकमेकांच्या रूममध्ये जात आहेत.

अनोळखी लोकांसोबत अफेअर करण्यासोबतच काही लोक त्यांच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये इकडून तिकडे फिरत आहेत. ही फारच गंभीर बाब असून याने आमच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जाणार आहे.

तसेच ते म्हणाले की, 14 दिवस उलटून गेल्यावरही काही लोकांना क्वारंटाईनमधेच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता लोकांचं फिरणं बंद करण्यासाठी आणि त्यांच्यात सोशल डिस्टंसिंग राहण्यासाठी अधिक सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

मार्च महिन्यात आरोग्य मंत्रालयाने 17 जागांवर आयसोलेशन सेंटर तयार केले आहेत. तर कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी कंपला आणि एनतेबेमध्ये 17 क्वारंटाईन सेंटर तयार केले आहेत. ज्यात सामाजिक दर्जा न बघता सर्वांची सुरक्षा निश्चित केली जाईल.

हॉटेल्स, हॉस्पिटल्स, लॉज आणि युनिव्हर्सिटीमध्ये तयार केलेले आयसोलेशन सेंटरमध्ये 232 पेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

युगांडामध्ये सध्या कोरोना व्हायरसचे 54 केसेस समोर आल्या आहेत तर 7 लोक बरे झाले आहे. सुदैवाने इथे अजून कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही.