शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता हेलिकॉप्टरमध्येही फिरता येईल डबल सीट, 'या' पठ्ठ्यानंं ड्रोनपासून तयार केलं दोन सीटर हेलिकॉप्टर....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 4:01 PM

1 / 9
जगभरात रोज कोणते ना कोणते अजब किंवा उपयोगी असे आविष्कार होत राहतात. चीनमध्ये तर असे अनेक आश्चर्यकारक आविष्कार रोज होत असतात. आता चीनच्या एका तरूणाने एक असं हेलिकॉप्टर तयार केलं ज्यामध्ये बसून दोन लोक प्रवास करू शकतात.
2 / 9
हे हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी चीनी नागरिकाने ड्रोनची मदत घेतली आहे. यात त्याने चार मोटरचा वापर केलाय. एक मोटर 19 हजार वॅटची पॉवर देते. ज्याच्या मदतीने मिनी हेलिकॉप्टर उडतं.
3 / 9
या मिनी हेलिकॉप्टरचं नाव ऑक्टोकॉप्टर असं ठेवण्यात आलं आहे. हे हेलिकॉप्टर 120 किलोचं वजन घेऊन हवेत उडण्याची क्षमता ठेवतं.
4 / 9
यात चारही बाजूने असे इलेक्ट्रिक डिवाइस लागलेले आहेत जे दिशा, गति आणि उंचीवर नियंत्रण ठेवतात. सोबतच मोटर चालण्यासही मदत करतात.
5 / 9
हे पूर्ण ऑक्टोकॉप्टर 170 सेंटीमीटर म्हणजे 5.57 फूट लांब आहे. हे तयार करण्यासाठी कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे.
6 / 9
हे हेलिकॉप्टर उडताना 150 किलोग्रॅमचं निहेटीव्ह लिफ्ट निर्माण करतं. म्हणजे हवेत उडताना याचं वजन 150 किलोग्रॅमपर्यंत पोहोचतं.
7 / 9
हे हेलिकॉप्टर तयार करणारा डेली झाओ सांगतो की, याचे सर्व पार्ट्स चीनमध्येच तयार केले आहेत. जर याने तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्हाला यातील जीपीएस सिस्टीमने तुम्हाला रस्त्याची माहिती मिळवू शकता.
8 / 9
झाओने सांगितले की, तुम्ही यात पोहोचण्याच ठिकाण फिक्स करा, नंतर हे हेलिकॉप्टर स्वत:ला तुम्हाला तिथे पोहोचवेल. फक्त हे तुम्हाला उडवावं लागेल. दिशा निवडण्याचं काम तो स्वत: करेल.
9 / 9
झाओ सांगतो की, या मशीनच्या माध्यमातून शहरांमध्ये पोलिसांना पेट्रोलिंगमध्ये मदत मिळेल. सोबतच इमरजन्सीमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठीही याचा फायदा करून घेता येईल.
टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञान