चीनने पृथ्वीवर आणलं अंतराळात पेरलेले तांदळांच बियाणं, 'स्पेस राईस'म्हणून फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:47 PM2021-07-19T21:47:58+5:302021-07-19T22:11:04+5:30

नव नवे दावे करणाऱ्या चीनन आता आणखी एक नवा दावा केला आहे. चीननं असा एक विक्रम केला आहे जो पाहुन तुम्ही सर्व थक्क व्हाल. या दाव्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष चीनने वेधुन घेतलं आहे.

चीनने अंतराळात तांदुळ पेरल्याचा दावा केला आहे. हे धान्य अंतरळात उगवलं आहे.

अंतराळातून आलेल्या या तांदुळाच्या दाण्यांना चीनने स्पेस राईस असं नाव दिलं आहे.

रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या चांद्रयानसह चीननं भात बियाणं अवकाशात पाठविलं होतं.

त्यानंतर आता अंतराळ यानातून १५०० तांदळाचे दाणे पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. त्यांचं वजन ४० ग्रॅम इतकं आहे.

स्पेस राइसच्या बियाण्याची लांबी सुमारे १ सेंटीमीटर एवढी आहे. चीन चंद्रावर संशोधन केंद्रही सुरू करण्याची योजना करत आहे.

चीन १९८७ पासून तांदूळ आणि इतर पिकांचे बियाणे अवकाशात पाठवत आहे.

अंतरळातून आणलेलं हे धान्य आता हे दक्षिण चीन कृषी विद्यापीठ परिसरामध्ये पेरले जाईल.

हे चीनने अंतराळात उगवलेलं पहिलं प्रायोगिक धान्य आहे. आता ते बियाण्याच्या स्वरूपात या देशानं पृथ्वीवर आणलं आहे.

काही काळ अंतराळाच्या निर्वात वातावरणात राहिल्यानंतर बियाण्यामध्ये बरेच बदल होतात. त्यांना जमिनीत पेरल्यास जास्त उत्पन्न मिळतं, असा चीनचा दावा आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीनने आतापर्यंत कापूस ते टोमॅटोपर्यंत असे २०० हून अधिक पिकांवर प्रयोग केले आहेत.