पाहून तिची हेअर आर्ट; तुम्हीही पडाल चाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 22:27 IST2019-06-11T22:22:42+5:302019-06-11T22:27:13+5:30

आयव्हरी कोस्टमध्ये राहणारी लटिशा तिच्या विविध हेअर स्टाईल्स प्रसिद्ध आहे.

अनेक मुलींना, तरुणींना विविध प्रकारच्या हेअर स्टाईल करायला आवडतात. मात्र लटिशाच्या हेअर स्टाईल्स अतिशय वेगळ्या अन् लक्षवेधी असतात.

विशेष म्हणजे लटिशा केवळ हेअर स्टाईल्स करत नाही. तिच्याकडे असणाऱ्या कलेतून ती अनेक विषयांवर, समस्यांवर भाष्य करते.

अहिंसा, स्त्री पुरुष समानता अशा विविध विषयांवर लटिशा हेअर स्टाईलमधून व्यक्त होते.

हेअर स्टाईल करण्याची आवड तिला वयाच्या पाचव्या वर्षापासून लागली.

अनेक गंभीर विषयांकडे लोकांचं लक्ष लेधण्यासाठी लटिशा तिच्या कलेचा वापर करते.

आपल्या हेअर स्टाईलमधून सामाजिक संदेश देण्याचा लटिशाचा प्रयत्न असतो.