अवघं 140 चौरस फुटांचं घर! तरीही जागाच जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 15:40 IST2019-11-13T15:36:18+5:302019-11-13T15:40:13+5:30

फ्रान्समधील एका कुटुंबासाठी एका कंपनीनं विशेष घराची उभारणी केली आहे.

घराचं क्षेत्रफळ फक्त १४० चौरस फूट आहे. मात्र तरीही त्यात जागाच जागा आहे.

बलुचॉन कंपनीनं तीन सदस्य असलेल्या कुटुंबासाठी हे घर तयार केलं आहे.

विशेष म्हणजे हे १४० चौरस फुटांचं घर कुठेही नेता येऊ शकतं.

या घराच्या खाली चाकं लावण्यात आली आहेत. त्यामुळे ते हवं तिथे नेता येतं.

मुंबईत १४० फूटांचं घर म्हणजे वन रुम किचन असा समज आहे. मात्र या घरात २ बेडरुम आहेत.

या घरात जागेचा अतिशय सुयोग्य वापर करण्यात आला आहे.

कमी जागेचा वापर जास्त वापर हे सूत्र यासाठी वापरण्यात आलं आहे.