दहावी नापास प्रिन्सची कमाल, 35 विमानांची केली निर्मिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 16:15 IST2019-11-19T16:03:05+5:302019-11-19T16:15:34+5:30

दहावीत नापास होऊनही अनेक जण मोठे अधिकारी, उद्योजक बनलेले आपण पाहिलेच असाल. मात्र, गुजरातमधील एका तरुणाने चक्क विमानांची निर्मिती केली आहे.
गुजरातमधील बडोद्यात राहणाऱ्या या 17 वर्षीय तरुणाने नाव आहे प्रिन्स पांचाल.
प्रिन्सचे कौशल्य पाहून सर्वच जण चकीत झाले आहेत.
विशेष म्हणजे, प्रिन्स हा दहावीत सर्वच विषयात नापास झाला होता. त्यानंतर त्याने रिकाम्या वेळेत इंटरनेटवर विमान बनवण्याचे तंत्र शिकून घेतले.
प्रिन्सने 35 अशी स्वदेशी विमाने तयार केली आहेत. या विमानांना रिमोट कंट्रोलने ऑपरेट करता येते.
प्रिन्सचे यु ट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्याद्वारे आपले प्रयोग नेहमी लोकांसमोर सादर करत असतो.
प्रिन्सचे विमान बनवण्याचे कौशल्य पाहून लोक त्याला ‘तारे जमीन पर’ वाला मुलगा असेही म्हणत आहेत.