शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus Vaccination : भारतात लसीकरणाचा 'सुपर फास्ट' वेग; World Bank च्या अध्यक्षांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 9:06 AM

1 / 9
सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोना विरोधातील या लसीकरण मोहिमेनं आता मोठा वेग पकडला आहे.
2 / 9
देशात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून काही दिवसांतच १०० कोटींचा आकडाही पार केला जाईल.
3 / 9
भारताच्या या वेगवान लसीकरण मोहिमेवर जागतिक बँकही खुश असल्याचं दिसून येत असून जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास यांनी भारताची लसीकरण मोहीम यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे.
4 / 9
कोरोना महासाथीच्या विरोधात भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेनं उत्तम कामगिरी केली आहे, असं डेविड मालपास यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान सांगितलं.
5 / 9
लसींच्या उत्पादनातही भारताचं योगदान हे कौतुकास्पद होतं असंही ते म्हणाले. यावेळी त्यांना लसीकरण मोहिमेव्यतिरिक्त हवामान बदलाच्या विषयावरही चर्चा झाली. भारताला प्रभावी योजनांच्या माध्यमातून वेळेनुसार ध्येय गाठावं लागेल, असंही ते म्हणाले.
6 / 9
यावेळी डेविड मालपास यांनी International Development Association मध्ये भारताच्या सक्रिय सहभागाचंही कौतुक केलं. यापुढेही भारत आपली निर्णायक भूमिका बजावत राहिल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
7 / 9
यादरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेवरही चर्चा करण्यात आली. भारतानं वेळेनुसार अनेक आवश्यक रिफॉर्म्स केले असल्याचं सांगत डेविड यांनी आनंद व्यक्त केला. तसंच जागतिक बँकेकडून भारताला कायम सहकार्य मिळत राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
8 / 9
भारतातील लसीकरण मोहिमेबाबत सांगायचं झालं तर आतापर्यंत ९७.२३ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसंच ७० लोकांना पहिला डोस आणि ३० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
9 / 9
एकीकडे करोना प्रतिबंधात्मक लसीकरणानं वेग पकडला आहे, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत आता कोरोनाबाधितांची संख्याही कमी होताना दिसत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld Bankवर्ल्ड बँकnirmala sitharamanनिर्मला सीतारामन