चीनमधील गुहांमध्ये रिसर्च करणारी WHO टीम म्हणाली - 'कोरोना संक्रमणाचे मिळाले मोठे पुरावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 02:36 PM2021-02-05T14:36:15+5:302021-02-05T14:42:57+5:30

टीमच्या एक सदस्याने सांगितले की, चीनमधील इतरही संभावित गुहांची तपासणी केली पाहिजे. जेथून संक्रमण पसरण्याचा धोका असेल.

चीनच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमुळे जगभरात कोरोना व्हायरस पसरला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्या चौकशीची मागणी करत आहे. चीनच्या वुहानमधील गुहांमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची टीम अभ्यास करत आहे. ही टीम कोरोना व्हायरस पसरण्यासंबंधी जेनेटिक पुरावे शोधत आहे. टीमच्या एक सदस्याने सांगितले की, चीनमधील इतरही संभावित गुहांची तपासणी केली पाहिजे. जेथून संक्रमण पसरण्याचा धोका असेल.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी टीम वुहानमधील गुहांमध्ये शोध करत आहेत, त्या टीमचे सदस्य पीटर डॅसजॅक आहे. पीटर एक झूओलॉजिस्ट आणि जंतु रोग तज्ज्ञ आहे. पीटर यांनी सांगितले की, त्यांना २०१९ च्या शेवटी पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत नवीन माहिती मिळत आहे. पण त्यांनी या नव्या माहितीबाबत विस्तृतपणे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, त्यांनी हे सांगितलं की, कोरोना व्हायरस प्रयोगशाळेत तयार केलेला नाही.

पीटर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची निर्मितीबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा आरोप-प्रत्यारोप झालेत. खासकरून अमेरिकेने चीनवर अनेकदा आरोप लावले की, चीनने महामारीबाबत बेजबाबदारपणा केला. योग्य वेळी माहिती दिली नाही. तेच, बीजिंग म्हणाले की, कोरोना व्हायरसचा जन्म त्यांच्या देशात नाही तर दुसऱ्या कोणत्या ठिकाणी झाला.

पीटर डॅसजॅक २००२-२००३ मध्ये पसरलेल्या सीवीयर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोमच(SARS) उत्पत्तीच्या शोधाच्या टीममध्येही होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने सांगितले होते की, हा व्हायरस चीनच्या दक्षिण-पश्चिममधील यून्नान प्रांतातील गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघळांमधून जगभरात पसरला होता.

पीटर न्यूयॉर्कमधील ईकोहेल्थ एलायन्सचे प्रेसीडेंटही आहेत. पीटर सांगतात की, ज्याप्रकारे सार्सच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी आम्हाला वेळ आणि संधी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी वेळ, संधी आणि ठिकाण दिलं पाहिजे. जर आपल्याला कोरोना व्हायरसचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक प्रकारच्या शोधासाठी पूर्ण स्वातंत्र मिळायला हवं.

पीटर म्हणाले की, अशा शोधासाठी उत्पत्तीचं ठिकाण माहीत असणं फार गरजेचं आहे. जर हे समजलं की, कोणत्या ठिकाणाहून कोणत्या जीवातून मनुष्यात आजार पसरत आहे तर त्या ठिकाणावरील मनुष्यांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालता येईल. ही पूर्णपणे तशीच स्थिती आहे जशी २००२ आणि २००३ मध्ये पसरलेल्या सार्सवेळी झाली होती. त्यावेळीही चीनच्या यून्नान प्रांतातील गुहांमधून हा आजार बाहेर आला होता. सार्स आणि कोविड-१९ चे व्हायरस मिळतेजुळते आहेत.

पीटर डॅसजॅक यांनी सांगितले की, त्यांना माहीत नाही की चीन वटवाघळांच्या गुहांचं सॅम्पलिंग करत आहेत की नाही. पण कोरोना व्हायरस आणि सार्सचे व्हायरस एकमेकांशी फार मिळतात. पीटरच्या टीमला सतत वुहानमधून नवीन माहिती मिळत आहे. त्यांना हे माहीत आहे की कोरोना व्हायरस कशाप्रकारे महामारीत बदलला. पण त्याबाबत सांगण्यास त्यांनी नकार दिला.

पीटर यांच्या टीमने आतापर्यंत जो रिसर्च केला आहे त्यानुसार एका निष्कर्ष असा निघाला आहे की, ही शक्यता आहे की वुहानमध्ये कोरोना व्हायरसची ओळख पटण्याआधीपासूनच चीनमध्ये कोरोना व्हायरस असेल. सर्कुलेटही झाला असेल पण याबाबत त्यावेळी कुणालाही याबाबत जास्त माहिती नसेल. पीटर म्हणाले की, याकडे आम्ही फार गंभीरतेने बघत आहोत.

पीटर म्हणाले की, आम्ही हा शोध घेत आहोत की, वुहानमध्ये कोरोना व्हायरस येण्याआधी याने सामुदायिक स्तरावर किती संक्रमण पसरवलं होतं. ज्याबाबत जगाला माहिती नाही. कदाचित चीनच्या सरकारलाही याबाबत माहिती नसेल. सर्वात कठिण काम हे आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्तीसोबत त्याच्या सर्वात पहिल्या केसची माहिती मिळवणे. म्हणजे सर्वातआधी कोणत्या व्यक्तीला संक्रमण झालं होतं. होऊ शकतं की, हे २०१९ मध्ये महामारी पसरण्याआधी झालं असेल.

पीटर म्हणाले की, चीनचं सरकार आणि स्थानिक प्रशासनाने गुहेत जाण्यासंबंधी किंवा शोधासंबंधी वा कोणत्याही प्रकारची मागणी नाकारली नाही. चीन सरकारकडून टीमला पुरेशी मदत मिळत आहे. आम्ही सर्व प्रमुख लोकांशी भेटत आहोत. ते आम्हाला मदत करत आहेत.

Read in English