अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 08:28 AM2020-05-16T08:28:12+5:302020-05-16T08:49:12+5:30

भारताला अनुदानाच्या स्वरूपात व्हेंटिलेटर देणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.

ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला अभिमान आहे की अमेरिका भारतासारख्या माझ्या मित्राला व्हेंटिलेटर दानाच्या स्वरूपात देणार आहे.

या साथीच्या वेळी आम्ही सर्व भारतासमवेत उभे आहोत. आम्ही लस तयार करण्यात एकमेकांना मदत करत आहोत. एकत्र मिळून आम्ही कोरोनासारख्या शत्रूचा पराभव करू, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, भारत एक महान देश आहे आणि पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत.

मी काही दिवसांपूर्वीच भारतातून परतलो आहे आणि आम्ही एकत्र (पंतप्रधान मोदी) राहिलो.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात नवी दिल्ली, अहमदाबाद आणि आग्रा या दौ-यांचा उल्लेख केला. यापूर्वी व्हाईट हाऊसच्या वतीने असे म्हटले जात होते की, अध्यक्ष ट्रम्प हे भारताशी अमेरिकन संबंधांबद्दल खूप खूश आहेत.

भारत हा अमेरिकेचा प्रमुख भागीदार बनला आहे. अमेरिका भारताला 200 व्हेंटिलेटर देऊ शकेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भारत आणि अमेरिका एकत्र मिळून लस तयार करीत आहेत जी लोकांना विनाशुल्क दिली जाऊ शकते. यापूर्वी अमेरिकेला मैत्रीखातर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठाही भारताने केला होता.

स्वत: ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासाठी विनंती केली होती. ट्रम्प यांची विनंती मान्य करत सरकारने औषधांचा मोठा माल अमेरिकेत पाठविला.

अमेरिकेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे औषध मागितले होते.

हे औषध मोठ्या प्रमाणात भारतात तयार केले जाते, म्हणूनच अमेरिका आणि अध्यक्ष ट्रम्प यांची मागणी त्वरित पूर्ण झाली. यासाठी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठाही केल्याची परतफेड म्हणून अमेरिका भारताला व्हेंटिलेटर देणार असल्याची चर्चा आहे.

Read in English