काय सांगता? शौचालयातही 'पारदर्शक कारभार'; लोक आत जातात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 04:12 PM2020-08-28T16:12:16+5:302020-08-28T16:18:20+5:30

टेक्नॉलॉजी किती बदलत जाईल याचा काही नेम नाही. टेक्नॉलॉजी जर तुमचा वेळ वाचवत असेल आणि तुमचं का सोपं करत असेल, तर ती लोकांकडून लगेच मान्य केली जाते. वेळ कुठल्याही माध्यमातून वाचत असेल तर नेहमीच त्या गोष्टीचं स्वागत होतं.

जपानची प्रगती ही केवळ त्यांच्या शिस्तप्रिय स्वभाव आणि वेळेची कदर करण्याची वृत्ती असल्याने झाली आहे हे आपण सगळे मान्य करतो. त्यातच जपानने लोकांचा वेळ वाचवण्यासाठी अजून एक टेक्नॉलॉजी समोर आणली आहे.

अनेकदा आपण घराबाहेर असताना सार्वजनिक शौचालय वापरतो. बऱ्याचदा इथे खूप वेळ वाट पहावी लागते. तसेच अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात असते. यावर उपाय म्हणून जपानने एक युक्ती शोधून काढली आहे.

जपानने सार्वजनिक शौचालयामध्ये एक टेक्नॉलॉजी वापरली आहे. या टेक्नॉलॉजीमुळे जर एखादा व्यक्ती ते शौचालय वापरत असेल तर ते तुम्हाला दुरुनच कळेल.

सार्वजनिक शौचालयामध्ये जाताना आपण दोन गोष्टींची काळजी करत असतो. एक म्हणजे स्वच्छता आणि दूसरी म्हणजे आतमध्ये कोणी आहे की नाही. मात्र टोकीय शहरातील सार्वजनिक शौचालय वापरताना या दोन प्रश्नांची उत्तर दूरुनच मिळतात. कारण त्यांनी ही सार्वजनिक शौचालय पारदर्शक केली आहे.

टोकीयोत सार्वजनिक शौचालये हे पूर्णपणे काचेने तयार करण्यात आले आहे. मात्र कोणतीही व्यक्ती जेव्हा शौचालयात जाते आणि दरवाजा लॉक करते, तेव्हा शौचालयाच्या भिंती या पारदर्शक न राहता त्यावर एक डार्क फिल्म तयार होते. यावरुन शौचालय कोणीतरी वापरत आहे, हे लगेच लक्षात येतं.

शौचालयाचा दरवाजा जोपर्यत लॉक होत नाही, तोपर्यत या काचेला पारदर्शक ठेवलं जातं आणि दरवाजा लॉक झाला की ही काच पारदर्शक राहत नाही.

Read in English