हे आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग, संपूर्ण प्रवासासाठी लागतात इतके दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 23:00 IST2020-02-19T22:51:22+5:302020-02-19T23:00:58+5:30
रेल्वेचा प्रवास हा सर्वांसाठी नेहमी कुतुहलाचा विषय राहिला आहे. आज आपण जाणून घेऊया जगातील सर्वात लांब रेल्वे मार्गांविषयी जे ट्रेन न बदलता करता येतात.

ट्रान्स सैबेरियन रेल्वे
मॉस्कोपासून प्याँगयाँगपर्यंचा हा मार्ग जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी सुमारे १० हजार २१४ किमी आहे.
द कॅनेडियन, कॅनडा
कॅनडामधील टोरँटो ते व्हँकुव्हर या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग ४४६५ किमी लांब आहे. या मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात.
चीन
शांघाई ते ल्हासा हा चीनमधील रेल्वेमार्ग 4372 किलोमीटर लांब आहे.
कॅलिफोर्निया, सायफर
एमेरविले ते शिकागोदरम्यान 3923 किलोमीटरचा रेल्वेप्रवास पूर्ण करण्यासाठी ५१ तास लागतात.
इंडियन पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया
सिडनी ते पर्थ मार्गावरील 4351 किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ६५ तास लागतात.
विवेक एक्स्प्रेस
आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावरील 4237 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या एक्सप्रेसला ८२ तास लागतात.