निळाशार समुद्र आणि निळसर आकाश; ही 5 ठिकाणं आहेत निसर्गाचा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 11:27 AM2019-06-17T11:27:48+5:302019-06-17T11:37:30+5:30

Jardines Del Rey च्या स्थित Cayo coco क्यूबाच्या उत्तरी किनाऱ्यावर हे ठिकाण आहे. वाइट सॅन्डी बीचवर कॉकटेलचा आनंद घेत क्रिस्टलसारख्या पाण्याचा आनंद घ्या. याठिकाणी हवाना येथे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान बुक करुन तेथून Caya Coco साठी डोमेस्टिक फ्लाइट प्रवास करा.

ज्या लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं आवडत नाही. अशांसाठी ही जागा परफेक्ट आहे. वियतनामच्या दक्षिण-पूर्व तटापासून 100 मिल अंतरावर हे ठिकाण आहे. भारत-वियतनाम अशी फ्लाइट बूक करुन तिथून Con-son साठी फ्लाइट मिळेल.

क्रिस्टलसारख्या निळसर पाण्याचा अनुभव घेण्यासाठी Havelock Island सारख्या ठिकाणीही तुम्ही जाऊ शकता. येथील सुंदरता या ठिकाणाची शान आहे. हैवलॉक अंदमान बेटाचा समुह आहे. अंदमान बेट भारत सरकारच्या अंतर्गत येतं.

जगातील सर्वात सुंदर स्वीमिंग पूल म्हणून प्रसिद्ध असलेला Sua Trench जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वीमिंग करण्याचा एक वेगळाच अनुभव याठिकाणी येतो. 30 मीटर लांब, जे लावा मैदानाच्या मधोमध आहे. तिथे जाण्यासाठी एका सिडीच्या सहाय्याने खाली उतरु शकतो. भारतापासून सिडनीला जा आणि त्यानंतर सिडनी समोआ असा 5 तासांचा विमान प्रवास करा

wakatobi, दक्षिण पश्चिम इंडोनेशिया स्थित चार बेटांचा मिळून एक बेट आहे. निळसर रंगाने संपूर्ण बेट एका स्वर्गाहून कमी नाही. फ्लाइटमधून उतरताना या बेटाचा नजारा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. भारतातून जकार्तासाठी फ्लाइट बूक करा. तिथून वांगी-वांगि द्वीपच्या मटहोरा विमानतळावरुन वाकाटोबी बेटासाठी फ्लाइट आणि नौका मिळेल.

टॅग्स :निसर्गNature