युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 03:13 PM2018-04-04T15:13:33+5:302018-04-04T15:13:33+5:30

कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील युट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) बंदुकधारी महिलेनं अंदाधुंद गोळीबार केला.

गोळीबार केल्यानंतर संशयित महिलेनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

या गोळीबारात 4 जण जखमी झाले असून एकाचा प्रकृती गंभीर आहे.

गोळीबार करणाऱ्या महिलेची ओळख नसीम अघदाम असी पटली असल्याचे वृत्त एनबीसीनं दिलं आहे.