बँक सुरक्षा कर्मचाऱ्याने मास्क लावण्यास सांगितले तर भडकले उद्योगपती, कर्मचाऱ्यांना दिली विचित्र शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 03:26 PM2021-10-22T15:26:46+5:302021-10-22T15:43:20+5:30

Petty millionaire withdraws entire savings : संतप्त उद्योगपतीने एका दिवसात जास्तीत जास्त 5 मिलियन युआन म्हणजेच 5,84,74,350 रुपये काढण्याचा अधिकार वापरला, जो तेथील बँक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही समस्येपेक्षा कमी नव्हता.

चीनमधील बँकेत एक विचित्र घटना घडली आहे. चीनमधील एका उद्योगपतीला बँकेतील सुरक्षा कर्मचाऱ्याने मास्क घातले नाही म्हणून जाब विचारला. यावर या उद्योगपतीने नाराजी व्यक्त करत बँकेतील सर्व पैसे काढण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर वाईट वागणुकीचा हवाला देऊन बँक कर्मचाऱ्यांना विचित्र शिक्षा दिली.

दरम्यान, शांघायमधील होंगमेई रोडवरील बँक ऑफ शांघायमध्ये गेलेल्या एका उद्योगपतीने बँक सुरक्षा कर्मचाऱ्याची वागणूक अतिशय वाईट असल्याचे सांगत, बँकेतून सर्व पैसे काढले आणि बँक कर्मचाऱ्यांना पैशांची मोजणी हातांनी करून देण्याची मागणी केली.

सोशल नेटवर्किंग साइट वीबोवर 'सनविअर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योगपतीने शांघायमधील एका बँक कर्मचाऱ्याच्या वाईट वर्तनामुळे नाराज झाल्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

संतप्त उद्योगपतीने एका दिवसात जास्तीत जास्त 5 मिलियन युआन म्हणजेच 5,84,74,350 रुपये काढण्याचा अधिकार वापरला, जो तेथील बँक कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही समस्येपेक्षा कमी नव्हता.

ते म्हणाले की, हाताने मोजून हे पैसे द्यावे लागतील. यानंतर, त्यांनी स्वत: बँक कर्मचाऱ्यांचे पैसे मोजत असतानाचे आणि बॅगमध्ये भरण्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया साइटवर शेअर करून लोकांना माहिती दिली.

उद्योगपतीने सांगितले की, जोपर्यंत मी या बँकेतून माझे संपूर्ण आयुष्यातील बचतीचे पैसे काढत नाही, तोपर्यंत मी शांघायमधील बँकेच्या शाखेत जात राहीन आणि बँकेतील कर्मचाऱ्यांना मला अशाप्रकारे पैसे द्यावे लागतील.

ज्या दिवशी उद्योगपतीने आपली रोख रक्कम काढण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम हाताने मोजावी लागली. तसेच, ते आपले सर्व पैसे बँकेतून बाहेर काढेपर्यंत, बँक कर्मचाऱ्यांना हाताने पैसे हाताने मोजत बसावे लागेल.

उद्योगपतीने आपल्या पोस्टमध्ये खरे नाव दिले नाही. जरी त्यांनी बँकेच्या सेवेबद्दल निराशा व्यक्त केली असली तरी एका श्रीमंत उद्योगपतीने बँक कर्मचाऱ्यांवर त्याच्याशी "सर्वात वाईट सेवा वृत्ती" असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, बँक सुरक्षा कर्मचाऱ्यांने उद्योगपतींना मास्क घालण्यासाठी अडवले, त्यावेळी त्यांना राग आला, असे बँकेने सांगितले आहे.