शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:51 PM

1 / 11
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या नकारानंतरही पाकिस्तानी सैन्याने लॉकडाऊन केला होता. लॉकडाऊन केल्यास कोरोनाने कमी पण उपासमारीने जास्त नागरिक मरतील अशी भीती इम्रान यांनी व्यक्त केली होती.
2 / 11
आता लॉकडाऊन झाल्याने पाकिस्तानची हालत न घर का, न घाट का अशी झाली असून जगाकडे भीक मागितली जात आहे. त्यातच जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देऊ केली आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांवर कारवाई करायची आहे.
3 / 11
एकीकडे पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ले, एलओसीवर गोळीबार करण्याचे धंदे सोडत नाहीय. अर्थव्यवस्था तर डबघाईला आली आहे. तरीही या पाकिस्तानी सैन्याला घसघशीत पगारवाढ हवी आहे.
4 / 11
इम्रान खान यांनी लॉकडाऊनसाठी पॅकेज देण्यासाठी पैसा नसल्याचे जाहीर केले आहे. तरीही पाकिस्तानी लष्कराला थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २० टक्के पगारवाढ हवी आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ३५००० लोक कोरोनाबाधित झाले आहेत.
5 / 11
पाकिस्तानी लष्कराने मागणी केली आहे की, २०२०-२१ साठी त्यांचा पगार २० टक्के वाढवावा. त्यांच्या संरक्षण मंत्रालयानुसार असे केल्यास तिजोरीला ६३६७ कोटींचा झटका बसू शकतो. मात्र, लष्कर अडून बसले आहे.
6 / 11
लष्कराचा पगार कमी आहे, तसेच महागाई कमालीची वाढली आहे. २०१९-२० मध्ये ब्रिगेडिअर रँकच्या अधिकाऱ्यांचा पगार ५ टक्के वाढविण्यात आला होता. तर जनरल अधिकाऱ्यांना काहीच पगारवाढ मिळाली नव्हती.
7 / 11
पाकिस्तानी लष्कराची ही मागणी अशावेळी आली आहे की, इम्रान खान यांना बऱ्याच निर्णय प्रक्रियेमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. लॉकडाऊन असे किंवा लष्कराला रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करणे असो, इम्रान यांना विश्वासात घेतले गेलेले नाहीय.
8 / 11
इम्रान खान यांच्यावर काश्मीरचा मुद्दा, अर्थव्यवस्था आणि कोरोनाला रोखण्यातील अपयशाचे खापर फोडले जाण्याची शक्यता आहे. यामुळे इम्रान खान अडचणीत सापडले आहेत.
9 / 11
पाकिस्तानने आजपर्यंत अमेरिका, चीन आणि जागतिक बँकांकडून मिळालेले अब्जावधी रुपये भारताविरोधात दहशतवादी पोसण्यावर उडविले आहेत. आज पाकिस्तानकडे कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी धड हॉस्पिटल नाहीत.
10 / 11
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, जागतिक मंदीचा पाकिस्तानवरही गंभीर परिणाम होणार आहे. पाकिस्तानची निर्यात ४० टक्के घटली आहे.
11 / 11
आर्थिक संकटामुळे पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ७६१ लोकांचा मृत्यू झाला आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला