Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:49 IST2025-05-08T09:44:46+5:302025-05-08T09:49:57+5:30

Operation Sindoor Photos: भारताने पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. हे अड्डे भारताने हवाई हल्ला करण्यापूर्वी अवकाशातून कसे दिसत होते आणि हल्ल्यानंतर कसे दिसत आहेत? बघा सॅटेलाईट कॅमेऱ्याने टिपलेले फोटो...

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सीमेपलिकडे आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांवर पलटवार केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ ठिकाणे भारताने उडवली. यात जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयाचाही समावेश आहे.

मेक्सार टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे सॅटेलाईट फोटो घेण्यात आले आहेत. यात पाकिस्तानातील बहावलपूरमधील जामिया मशीद आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकज सुभानल्लाह दिसत आहे.

भारतीय लष्कराने मिसाईल डागण्यापूर्वी ही दोन्ही ठिकाणे अवकाशातून कशी दिसत होती आणि नंतर त्यांची अवस्थात काय झाली आहे, हे फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.

भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या जामिया मशि‍दीची अवस्था कशी झाली आहे, याचे तीन फोटो सॅटेलाईटमधून टिपण्यात आले आहेत.

भारतीय लष्कराने मुरिदके शहरातील दहशतवाद्यांच्या एका अड्ड्यावरही हवाई हल्ला केला. पहिल्या हिरवळ दिसत असलेला पहिला फोटो हा हल्ला करण्यापूर्वीचा आहे. तर दुसरा फोटो भारताने हे ठिकाण लक्ष्य केल्यानंतरचा आहे.

भारताने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय मरकज सुभानल्लाहही उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी आतमध्ये आहे. इथेच दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम केले जात होते.

मरकज सुभानल्लाहमध्येच भारताविरोधात घातपाताचे कट रचले जात होते. इथेच दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात होते. इथेच करण्यात आलेल्या हल्ल्यात मोस्ट वाॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळचे ४ साथीदार ठार झाले आहेत.