Onion Price in Philippines : 'या' देशात कांद्याचा भाव चिकन-मटणापेक्षा जास्त, किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 04:19 PM2023-02-26T16:19:06+5:302023-02-26T16:35:59+5:30

Onion Price in Philippines : फिलीपिन्समध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यामागे जागतिक चलनवाढ, हवामान बदल अशी अनेक कारणे आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये महागाई गगनाला भिडत असून येथील लोक खाण्यापिण्यासाठी तळमळत आहेत. फिलीपिन्समध्ये महागाई इतकी आहे की इथल्या कांद्याचा भाव चिकनच्या कितीतरी पटीने वाढला आहे.

फिलीपिन्समध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यामागे जागतिक चलनवाढ, हवामान बदल अशी अनेक कारणे आहेत. फिलीपिन्समधील कांद्याच्या दराने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

मनिला सुपरमार्केटमध्ये कांद्याचे भाव अलिकडच्या काही महिन्यांत 800 पेसो (फिलीपिन्सचे चलन) म्हणजेच प्रति किलो 1,200 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे कांदा चिकन-मटणापेक्षा महाग झाला आहे.

दुसरीकडे, कांद्याचा भाव 1200 रुपये किलोवर पोहोचल्यानंतर तो घराघरांतून आणि हॉटेलमधून गायब झाला आहे. कांद्याचा वापर करण्यात येणारे अनेक पदार्थ रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध नाहीत.

एकीकडे कांद्याचे भाव वाढल्याने नागरिक प्रचंड नाराज झाले आहेत, तर शेतकरी मात्र सुखावला आहे. शेतात कांद्याचे पीक तयार झाल्यानंतर ते ताबडतोब काढणी घेतात, जेणेकरून ते बाजारात चढ्या भावाने विकून मोठी कमाई करता येईल.

फिलीपिन्समधील महागाई 14 वर्षांतील सर्वात मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. खाण्यापिण्याच्या अत्यावश्यक गोष्टींसाठी लोकांना येथे भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.

फिलीपिन्समध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्यामागे जागतिक चलनवाढ, हवामान बदल अशी अनेक कारणे आहेत.फिलीपिन्समध्ये कांदे 0.3 टक्क्यांनी महाग झाले आहेत.