पाकिस्तानात तेलाचा भडका! पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, जनतेला वाऱ्यावर सोडून US ला करतोय पुरवठा? होतेय भारताशी तुलना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 09:59 IST2026-04-03T09:54:30+5:302026-04-03T09:59:29+5:30
Pakistan Petrol Diesel Price Hike : माध्यमांतील वृत्तांनुसार, अनेक पेट्रोल पंपांवर कर्मचारी १२ बजेपर्यंत पेट्रोल आणि डिझेल भरण्यास तयार नव्हते. यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्याचेही वृत्त आहे.

सध्या पाकिस्तान अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थीचा आव आणताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात या युद्धामुळे त्याचेच पुरते कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानात अक्षरशःइंधनाचा भडका उडाला आहे. जनता प्रचंड संताप व्यक्त करत आहे.

येथे तेलाचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे की, शहबाज शरीफ सरकारने रात्रीतूनच पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३७, तर डिझेलच्या दरात १८४ रुपयांची प्रचंड वाढ केली आहेे. या क्रूर दरवाढीनंतर आता पाकिस्तानात पेट्रोल ४५८ तर डिझेल ५२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

तेलाच्या दरवाढीने जनता भडकली; पेट्रोल पंपांवर रांगा अन् हिंसाचार - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचीचे वृत्त येताच, जुन्या दरात आपल्या वाहनांच्या टाक्या फूल करण्यासाठी पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लोकांची झुंबड उडाली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनेक पेट्रोल पंपांवर कर्मचारी १२ बजेपर्यंत पेट्रोल आणि डिझेल भरण्यास तयार नव्हते. यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्याचेही वृत्त आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीची घोषणा करताना, पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक म्हणाले , देशातील संसाधनांच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी सरकारला तेलाच्या किमती वाढवणे भाग पडले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्यासंदर्भातच त्यांनी भाष्य केले आहे.

जनता वाऱ्यावर, अमेरिकेला होतोय तेल पुरवठा? धक्कादायक गोष्ट म्हणजे, इराणकडून 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून जहाजांना परवानगी मिळाली असतानाही, पाकिस्तान स्वतःच्या जनतेला वाऱ्यावर सोडत, खाडी देश सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीरात आणि ओमानमधून निघालेली आपली तेलाची जहाजे थेट अमेरिकेला पोहोचवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

भारताशी तुलना - गेल्या २८ दिवसांत पाकिस्तानात पेट्रोल १९२ रुपयांनी महागले आहे. यामुळे जनता संतापली आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, भारताचे उदाहरण दिले जात आहे. भारतात जानेवारीपासून पेट्रोल ९५ रुपयांवर स्थिर असून पाकिस्तानात मात्र जनता महागाईच्या खाईत ढकलली जात आहे.

पाकिस्तानातील पेट्रोल दरवाढीने संपूर्ण देशातच मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे फळे, भाजीपाला, पीठ, दूध, तांदूळ यांसारख्या दैनंदिन वस्तूच्या किंमती वाढतील. एवढेच नाही तर याचा फटका उद्योगधंद्यांनाही बसू शकतो.

शाहबाज शरीफ...

















