Nostradamus Predictions For 2023: 'गहू इतका वाढेल की लोक एकमेकांना खातील'; नॉस्ट्रॅडॅमसच्या २०२३ मधील भविष्यवाणीचा अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 08:49 PM2022-11-23T20:49:26+5:302022-11-23T20:55:35+5:30

Nostradamus predictions for 2023: . 'मोठे बदल होतील, भयंकर भयानकता आणि प्रतिशोध पाहायला मिळेल.' असे नॉस्ट्रॅडॅमसने म्हटले आहे.

फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस सर्वांनाच माहिती आहे. त्याने केलेल्या भविष्यवाण्या आजवर खऱ्या ठरल्याचे त्याचे अनुयायी नेहमी दावा करत असतात. आता त्याने २०२३ साठी काही भविष्यवाण्या करून ठेवलेल्या आहेत. त्याने हिटलर आणि जर्मनी, 9/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांबाबतही सांगून ठेवले होते. त्याने अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येबाबत लिहिले होते, असे दावे आहेत.

२०२३ साठी याच नॉस्ट्रॅडॅमसने कोरोनासारख्या महामारीनंतर जगावर आर्थिक संकट निर्माण होईल असे म्हटले होते. कोरोना संकट संपून आता दोन वर्षे झालेली आहेत. त्यातून जग सावरत नाही तोच रशियाने युक्रेनवर हल्ला करून परिस्थिती आणखीनच बिघडवली आहे. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीनुसार परिस्थिती आणखीन खालावणार आहे.

नॉस्ट्रॅडॅमसने 'गहू इतका वाढेल की लोक एकमेकांना खातील', असे म्हटले आहे. याचा अर्थ आता समजू लागला आहे. रशिया आणि युक्रेन हे गव्हाचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. युद्धानंतर गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, रशियावर निर्बंध असल्याने रशिया हा गहू विकू शकत नाहीय. यामुळे गव्हाची टंचाई आणि आर्थिक संकटाकडे नॉस्ट्रॅडॅमसने लक्ष वेधले आहे.

नॉस्ट्रॅडॅमसने ग्लोबल वॉर्मिंगवरही लिहिले आहे. 'सूर्य चमकेल आणि समुद्रातील मासे उकळतील.' असे त्याने म्हटले आहे. याचा अर्थ तापमान वाढेल आणि समुद्राच्या पाण्याचा स्तर वाढेल. हे २०२३ मध्ये होऊ शकते, असे त्याने म्हटले आहे. २०२२ मध्ये उष्णता वाढल्याचे युरोपसारख्या थंडीच्या भागात दिसून आले आहे.

ज्यांच्यावर अत्याचार झाले ते लोकही उभे राहतील, असे नॉस्ट्रॅडॅमसने म्हटले आहे. 'मोठे बदल होतील, भयंकर भयानकता आणि प्रतिशोध पाहायला मिळेल.' असे त्याने म्हटले आहे. याचा अर्थ लावणाऱ्यांनी २०२३ मध्ये गृहयुद्धाची शक्यता व्यक्त केली आहे. आता यात देश कोणता हे सांगता आलेले नाही. तर काही लोकांच्या दाव्यानुसार हे युद्ध श्रीमंत विरुद्ध गरीब असे असेल. काही लोक इराण आणि पाकिस्तानातील बंडाकडे यादृष्टीने पाहत आहेत.

रशिया-युक्रेन युद्ध 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचे रूप घेईल आणि जगासाठी विनाशकारी ठरेल, यासारखी भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने केली आहे. 'सात महिने महायुद्ध, वाईट कृत्यांमुळे लोक मरण पावले.', असे त्याने म्हटले आहे. रशियाने युक्रेन युद्धात अणुबॉम्बचा वापर केला तर तिसरे महायुद्ध सुरू होईल. या भविष्यवाणीत त्यांनी फ्रान्सचे रौन शहर युद्धापासून सुरक्षित राहिल, पण पॅरिसला धोका असल्याचे म्हटले आहे.

'राजगृहावर आकाशीय आग.' अशी देखील भविष्यवाणी त्याने केली आहे. नॉस्ट्राडेमसच्या या भविष्यवाणीचा लोक त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावतात. एक संस्कृती संपेल आणि तिच्या राखेतून नवीन संस्कृती जन्माला येईल. काहींचा असा विश्वास आहे की ते जगाचा अंत दर्शविते, कार अनेक ग्रंथांमध्ये जगाचा अंतही अग्नीनेच दाखवला गेला आहे.

नॉस्ट्राडेमसने आपल्या भविष्यवाणीत मंगळ ग्रहाचा उल्लेख केला आहे. 'मंगळावर प्रकाश पडत आहे.' असे तो म्हणाला आहे. काही लोक मंगळावर मानव पहिले पाऊल ठेवेल असे म्हणत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की 2023 मध्ये मंगळाशी संबंधित कोणतीही महत्त्वाची मोहीम सुरू केली जाऊ शकते.