North Korea Missiles : उत्तर कोरियाने जगाचं टेन्शन वाढवलं, धोकादायक मिसाइलची केली चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 01:58 PM2023-03-18T13:58:20+5:302023-03-18T14:07:04+5:30

North Korea Missiles :उत्तर कोरियाने आता पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवले आहे.

उत्तर कोरियाने आता पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवले आहे.

उत्तर कोरियाने आता पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवले आहे. आण्विक हल्ल्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाचे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र असल्याचे बोलले जात आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला १३००० किमी आहे.

हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. त्याची पहिली चाचणी ४ जुलै २०१७ रोजी झाली. हे क्षेपणास्त्र १०,४०० किमी पर्यंत मारा करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Hwasong-13 आंतरखंडीय क्षेपणास्त्र पहिल्यांदा १५ एप्रिल २०१२ रोजी एका परेडमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. आता उत्तर कोरियाच्या सैन्यातून ते काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता ४,५०० किमी आहे. हे १४ मे २०१७ रोजी पहिल्यांदा लाँच करण्यात आले.

Hwasong-10 हे देखील मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची श्रेणी २,५०० ते ४,००० किमी दरम्यान असल्याचे सांगितले जाते.

उत्तर कोरिया नेहमी या कुरापतींमुळे चर्चेत असते. दोन वर्षापूर्वीही त्यांनी अशीच एक चाचणी घेतली होती.