शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

World Most Expensive House: जगातील सर्वात महागड्या घराची होतेय विक्री, सिनेमा हॉलसह आहेत या आलिशान सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:03 PM

1 / 5
कॅलिफोर्नियामधील सुंदर पर्वतरांगामध्ये असलेल्या जगातील सर्वात महागड्या घराची विक्री होत आहे. या घराचे नाव The One आहे. हे घर सुमारे १० हजार चौरस फूट जागेत बांधलेले आहे. येथे अनेक आलिशान सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर या घरात राहणाऱ्यांना प्रसिद्ध हॉलिवूड स्टार्स आणि जगातील काही सर्वात श्रीमंत व्यक्तींचा शेजार लाभणार आहे. मात्र हे घर जितके आलिशान आहे. तितकीच याची किंमतही मोठी आहे.
2 / 5
या घराच्या मालकाच्या डोक्यावर १६५ मिलियन डॉलर म्हणजेच १२ अब्ज २४ कोटी रुपयांचे कर्ज झालेले आहे. या कर्जाची फेड करण्यासाठी घरमालक निर्धारित किंमतीपेक्षा कमी किमतीला हे घर विकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
3 / 5
चित्रपट निर्मात्यापासून इंटिरिय डिझायनर बनलेल्या Nile Niami यांनी या घराची डिझाईन तयार केली आहे. त्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे सात वर्षे खर्ची घातली. या शानदार घराच्या ले आऊट आणि इंटिरियरची चर्चा व्हायची. मात्र लोकांनी या घराचे फोटो पाहिले नव्हते. आता घराच्या मालकांनी पहिल्यांदाच या घराचे फोटो सार्वजनिक केले आहेत.
4 / 5
या घराचे सौंदर्य आणि सुविधा पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता घरमालकांना अपेक्षा आहे की, हे फोटो पाहिल्यानंतर त्यांना प्रॉपर्टीची चांगली किंमत देणार खरेदीदार मिळेल.
5 / 5
यापूर्वी सौदीच्या राजकुमारांनी एक फ्रान्सिसी रिसॉर्ट ३०० मिलियन डॉलर २२ अब्ज २५ कोटी रुपयांना खरेदी करून सर्वात महागड्या घराची खरेदी करण्याचा विक्रम नोंदवला आहे. तर अमेरिकेतील सर्वात महागड्या घराची खरेदी अब्जाधीश केन ग्रिफिन यांनी मॅनहॅटनमध्ये २३८ मिलियन डॉलर एवढी रक्कम मोजून केली होती. चीनमधील एका व्यावसायिकाने ब्रिटनमध्ये बंगल्याची खरेदी करण्यासाठी २७५ मिलियन डॉलर एवढ्या रकमेचा व्यवहार केला होता.
टॅग्स :HomeघरJara hatkeजरा हटकेUnited Statesअमेरिका