Join us  

ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा

अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी संथ खेळपट्टीवरही आक्रमक फटकेबाजी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 9:59 PM

Open in App

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी संथ खेळपट्टीवरही आक्रमक फटकेबाजी केली. लखनौ सुपर जायंट्सला जिथे पॉवर प्लेमध्ये फक्त २७ ( २ विकेट्स) धावा करता आल्या होत्या. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने १६६ धावांचा पाठलाग करताना पाच षटकांत ८७ धावा उभ्या केल्या. ट्रॅव्हिस हेडने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. 

SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ३ षटकांत ७ धावा देऊन २ विकेट्स घेताना LSG ला जखडून ठेवले. क्विंटन डी कॉक ( ५) व मार्कस स्टॉयनिस ( ३) पॉवर प्लेमध्ये माघारी परतले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल  घेतले. कृणाल पांड्या व लोकेश राहुल यांनी ३६ धावा जोडून लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु  पॅट कमिन्सने १०व्या षटकात लोकेशला ( २९) माघारी पाठवले. १२व्या षटकात कमिन्सच्या भन्नाट थ्रोवर कृणाल ( २४) रन आऊट झाला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले.  बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. 

लखनौकडून पाचव्या किंवा खालच्या क्रमांकावरील सर्वोत्तम ९९ धावांच्या भागीदारीची नोंद बदोनी व पूरन यांच्या नावावर झाली. यापूर्वी दीपक हुडा व बदोनी यांनी वानखेडेवर गुजरात टायटन्सविरुद्ध ८७ धावा जोडल्या होत्या.  SRH च्या सलामीवीरांनी मात्र LSG च्या परस्परविरुद्ध सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी पहिल्या १८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचले. कृष्णप्पा गौतमच्या तिसऱ्या षटकात हेडने ६,०,४,६,६,० असे फटके खेचून लखनौला हतबल केले. लोकेशने त्याचा प्रमुख गोलंदाज रवी बिश्नोईला चौथ्या षटकात आणले, परंतु अभिषेकने त्याचे षटकाराने स्वागत केले. हैदराबादाने ३.१ षटकांत ५३ धावा फलकावर चढवल्या. पुढच्या चेंडूवर अभिषेकची कॅच मिळाली असती, परंतु डीप शॉर्ट थर्डमॅनला गौतमने झेल टाकला. बिश्नोईच्या पहिल्याच षटकात १५ धावा चोपल्या गेल्या. नवीन उल हकच्या पाचव्या षटकात ट्रॅव्हिड हेडने वादळ आणले. त्याने १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यात ५ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. हेडने १८ चेंडूंत ५८ धावा कुटल्या आणि त्यात ७ चौकार ५ षटकारांचा समावेश होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या आणि यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा त्यांनी पॉवर प्लेमध्ये शतक पूर्ण केले. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स