Kiss Day 2023: किस घेतल्याने होऊ शकतात हे पाच गंभीर आजार, राहा सावध, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:31 AM2023-02-13T09:31:59+5:302023-02-13T09:38:46+5:30

Valentine's Day 2023: किस अर्थात चुंबनाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. मात्र शास्त्रज्ञांच्या मते किस केल्याने अनेस संसर्गजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढतो. हे आजार पुढीलप्रमाणे...

प्रेम करताना आपल्या पार्टनरला किस करणे ही सामान्य बाब आहे. नातं आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडपी नेहमीच एकमेकांना किस करतात. दरवर्षी व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी किस डे सेलिब्रेट केला जातो. किस अर्थात चुंबनाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. मात्र शास्त्रज्ञांच्या मते किस केल्याने अनेस संसर्गजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढतो. हे आजार पुढीलप्रमाणे...

सर्वसाधारणपणे हर्पिसचे विषाणू दोन प्रकारचे असतात. HSV-1 आणि HSV-2 हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार HSV-1 विषाणू किसच्या माध्यमातून शरीरामध्ये सहजपणे शिरकाव करू शकतो. ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या ६७ टक्के लोकांमध्ये हा विषाणू असण्याची शक्यता आहे. तोंड आणि गुप्तांगावर पडणारे पांढऱ्या किंवा लाल रंगाचे व्रण हे याचं प्रमुख लक्षण मानलं जातं.

सायटोमेगालोव्हायरस हा असा विषाणूजन्य संसर्ग आहे जो लाळेच्या संपर्कात आल्याने फैलावतो. त्याशिवाय हा विषाणू लघवी, रक्त, सिमेन आणि ब्रेस्ट मिल्क यांच्या माध्यमातूनही पसरू शकतो. हा विषाणू बहुतांशी तोंड किंवा गुप्तांगाच्या संपर्कात आल्याने पसरतो.

सिफलिस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. तो किंस किंवा सेक्शुअल अॅक्टिव्हिटीजमुळे होऊ शकतो. सिफलिसच्या संपर्कात आल्यामुळे तोंडामध्ये घाव किंवा फोड यासारखी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र हा संसर्ग अॅटीबायोटिक्स औषधं वापरून नियंत्रणात आणता येऊ शकतो.

किस केल्यामुळे मॅनिंजायटिसशी शिकार होण्याची शक्यताही वाढते. हे बॅक्टेरियल इन्फेक्शन सर्वसाधारणपणे किस केल्याने पसरते. ताप, डोकेदुखी किंवा मान आखडणे ही याची काही प्रमुख लक्षणे आहेत. शरीरामध्ये अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

सर्वसाधारणपणे रेस्पिरेटरी सिस्टिमशी संबंधित समस्यांसाठी थंडी किंवा ताप हे कारण मानले जाते. या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीसोबत एकाच खोलीत राहिल्याने किंवा त्याने वापरलेल्या वस्तूंचा वापर केल्यामुळेही पसरू शकतो. मात्र किस केल्याने हा विषाणू पसरण्याची शक्यता अधिक वाढते.