शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता काय होणार? इस्रायलमध्ये 10 भारतीय कंपन्यांचा मोठा व्यवसाय; युद्धाने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 3:44 PM

1 / 6
Israel-India Trade: शनिवारी(दि.7) पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel-Hamas War)ने इस्रायलवर अचानक शेकडो रॉकेट डागले. यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. तसेच, इस्रायलने हमासला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या ताकतीने हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले. या युद्धात दोन्ही बाजुच्या हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, भाराताचा इस्रायलशी थेट व्यापारिक संबंध आहे. त्यामुळे या युद्धाचा भारतीय कंपन्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
2 / 6
शनिवारी हमासने हल्ला करुन इस्रायलविरोधात युद्ध छेडले. या युद्धाची जगभर चर्चा सुरू आहे. भारताबाबत बोलायचे झाले, तर युद्धामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार कोसळला. सोमवारी इस्रायलशी थेट संबंध असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. हे युद्ध अजून बराच काळ चालणार आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसांतही भारतीय बाजारावर याचा परिणा दिसू शकतो.
3 / 6
इस्रायलचे भारताशी चांगले संबंध असून दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधही सखोल आहेत. एकीकडे 500 हून अधिक इस्रायली कंपन्यांचा भारतात व्यवसाय आहे, तर अनेक भारतीय कंपन्याही इस्रायलमध्ये व्यवसाय करत आहेत. काही मोठ्या कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्सची, हैफा पोर्टमध्ये 70 टक्के भागीदारी आहे. युद्धामुळे अदानी पोर्ट्सचे शेअर 5.09 टक्क्यांनी घसरुन सोमवारी 788.50 रुपयांवर बंद झाले. मात्र, मंगळवारी त्यात वाढ झाली आहे.
4 / 6
इस्रायलमध्ये व्यवसाय करणारी दुसरी मोठी कंपनी सन फार्मास्युटिकल्स आहे. सोमवारी या फार्मा कंपनीचे शेअर्सही रेड लाईनवर बंद झाले. सन फार्माच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, सन फार्मा इस्रायलमधील आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी तारो फार्मास्युटिकल्समधील प्रमुख भागधारक आहे. हमासच्या हल्ल्यामुळे आणि इस्रायलच्या प्रत्युत्तरामुळे सुरू झालेले युद्ध आणखी पुढे गेल्यास त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर दिसू शकतो. फार्मा क्षेत्रातील इतर भारतीय कंपन्यांचेही इस्रायलसोबत संबंध आहेत, ज्यात डॉ. रेड्डी आणि लुपिन सारख्या नावांचा समावेश आहे.
5 / 6
आयटी क्षेत्रातील बड्या भारतीय कंपन्यांचाही इस्रायलमध्येही व्यवसाय पसरलेला आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो, या कंपन्यांचा समावेश आहे. युद्ध वाढल्यास झाल्यास या कंपन्यांच्या शेअर्सवरही मोठा परिणाम पडू शकतो. TCS चे सुमारे 1000 कर्मचारी इस्रायलमध्ये कार्यरत आहेत.
6 / 6
देशातील सर्वात मोठी बँक, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची देखील इस्रायलमध्ये उपस्थिती आहे. युद्धामुळे बँकेचा व्यवसाय प्रभावित होण्याची शक्यता वाढली आहे. सोमवारी SBI चे शेअर्स 1.53 टक्क्यांनी घसरले. याशिवाय भारत आणि इस्रायल यांच्यातील डायमंड आणि दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित कंपन्यांवरही युद्धाचा परिणाम होऊ शकतो.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारतIsraelइस्रायलbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकAdaniअदानीTataटाटा