ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:58 IST2025-06-06T12:32:59+5:302025-06-06T12:58:35+5:30

हे क्षेपणास्त्र किती खास आहे, किती महागडे आहे आणि ते खरोखरच ब्रह्मोसची कॉपी आहे का? जाणून घेऊया...

रशियाने ५ जून २०२५ च्या रात्री ओरेश्निक नावाच्या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइसच्या (IRBM) सहाय्याने युक्रेनवर प्रतिहल्ला केला. हे रशियाचे सर्वात प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्र मानले जाते. काही लोक याला इंडो-रशियन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची कॉपी असल्याचेही म्हणतात. कारण हे मिसाइल प्रचंड वेगने अनेक टार्गेट्सवर मारा करू शकते. तर हे क्षेपणास्त्र किती खास आहे, किती महागडे आहे आणि ते खरोखरच ब्रह्मोसची कॉपी आहे का? जाणून घेऊया...

काय आहे ओरेश्निक मिसाइल? - ओरेश्निक (रशियात "हेजल ट्री") एक हाइपरसोनिक इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल आहे. जे रशियाने युक्रेनविरोधात वापरले. हे मिसाइल 21 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्यांदात युक्रेनच्य ड्निप्रो शहरातील एका संरक्षम फॅक्ट्रीवर डागण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, हे मिसाइल पश्चिमेकडील एयर डिफेन्स सिस्टिमलाही भेदू शकते. तसेच, मॅक 11 (12,300 किमी/तास) एवढ्या वेगाने उडू शकते.

मिसाइलचे वैशिष्ट्य - हे मिसाइल मॉस्को इन्स्टिट्यूट फॉर थर्मल टेक्नॉलॉजी (MITT) अँड सोझवेझदीने विकासित केले आहे. हे मिसाइल म्हणजे, RS-26 रुबेझ मिसाइलचे सुधारित रूप असून यात बुलावा क्षेपणास्त्राचे काही भाग समाविष्ट करण्यात आले आहेत.

महत्वाचे म्हणजे हे मिसाइल अण्विक आणि बिगर अण्विक वारहेड घेऊन जाण्यासही सक्षम आहे. ड्निप्रो हल्ल्यात बिगर-अण्विक वॉरहेड वापरले गेले. मात्र काही तज्ज्ञांच्या मते, हे ब्रह्मोस प्रमाणे क्रूझ मिसाइल नाही. तर बॅलिस्टिक मिसाइल आहे, त्याच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानात मोठा फरक आहे.

महत्वाचे म्हणजे, ओरेश्निक हे इस्कंदर-1000 मिसाइलच्या तुलनेत बरेच महाग आहे. मात्र याची नेमकी किंमत अज्ञात आहे. काहींनी याच्या उत्पादनात कोट्यवधी रुपयांची चोरी केल्याचा दावा केला आहे.

ओरेश्निक मिसाइलची खासियत - ओरेश्निक मिसाइल त्याचा वेग आणि अनेक लक्ष्यांवर मारा करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या मिसाइलचा वेग मॅक ११ (१२,३०० किमी/तास किंवा ३.४ किमी/सेकंद) अर्थात ध्वनीच्या वेगापेक्षाही ११ पट अधिक आहे. महत्वाचे म्हणजे, हे मिसाइल एवढे वेगवान आहे की, रडार अथवा हवाई संरक्षण प्रणालीही (जसे की THAAD) ते ट्रॅक करू शकत नाही.

रेंज - या मिसाइलची रेंज 5,000 ते 5,500 किमी एवढी आहे. हे मिसाइल युरोपातील अधिकांश भागांना आणि युक्रेन कव्हर करू शकते.

वारहेड: 6 स्वतंत्रपणे निशाना बनवणारे वारहेड्स (MIRVs), प्रत्येकात 6 सबम्यूनिशन (एकूण 36). हे मिसाइल एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ला करू शकते. तसेच, अणु किंवा अणु पेलोड वाहून नेण्यासही हे मिसाइल सक्षम आहे.

ड्निप्रो हमल्ल्यात बिगर अण्विक वारहेडचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक वारहेडचे वजन अज्ञात आहे. मात्र, हे अणुबॉम्ब एढे विनाशकारी होऊ शकते. असा दावा रशियाने केला आहे.

ओरेश्निक ब्रह्मोसची कॉपी आहे? ऑरश्निक हे ब्रह्मोसची (भारत-रशियाचे संयुक्त मिसाइल) कॉपी असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र दोन्हींमध्ये बराच फरक आहे.

ऑरश्निक आणि ब्रह्मोसमधील फरक - हे दोन्ही हायपरसोनिक मिसाल आहेत. ब्रह्मोसचा वेग मॅक ३-४ आहे आणि ओरेश्निकचा मॅक ११ आहे. दोन्हीही अनेक टर्गेटवर मारा करू शकतात. ब्रह्मोस अँटी-शिप आणि लँड-अटॅकसाठी तरबेज आहे. तर ओरेश्निक हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. दोहोंतही रशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ब्रह्मोसमध्ये रशियन रॅमजेट इंजिन आहे तर ओरेश्निकमध्ये आरएस-२६ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

अंतर - ब्रह्मोस क्रूझ मिसाइल कमी उंचीवर उडते आणि मार्ग बदलू शकते. तर ओरेश्निक बॅलिस्टिक मिसाइल उंचावर उडते आणि एमआयआरव्ही वाहून नेऊ शकते. ब्राह्मोस ६००-८०० किमी (ब्रह्मोस-२, १००० किमीपर्यंत असू शकते) तर ओरेश्निक ५०००-५५०० किमी.पर्यंत पोहोचू शकते.

वॉरहेडचा विचार करता, ब्रह्मोस सिंगल वॉरहेड (२००-३०० किलो), अणु-नसलेले तर ओरेश्निक ६ एमआयआरव्ही, अणु अथवा अणु-नसलेले वाहून नेऊ शकते.