जर्मनी- भीषण रेल्वे अपघातात 50 प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 04:31 PM2017-12-06T16:31:48+5:302017-12-06T16:34:04+5:30

जर्मनीच्या डसेलडोर्फ शहराच्याजवळ ट्रेन अपघात होऊन 50 प्रवासी जखमी झाले आहेत.

डसेलडोर्फ जवळ एक्स्प्रेस आणि मालगाडी समोरसमोर येऊन हा अपघात झाला.

एक्स्प्रेसमधून जवळपास 100 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.

याआधी मे महिन्यात एक ट्रेन पटरीवरून घसरून अपघात झाला होता. त्या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले होते.

टॅग्स :अपघातAccident