भारत नाही तर या देशांमध्ये होतात सर्वात कमी घटस्फोट, पती-पत्नी शेवटपर्यंत निभावतात साथ, भारताचा नंबर कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:54 IST2025-04-12T12:42:51+5:302025-04-12T12:54:22+5:30

Divorces News: खरं तर विवाहामुळे केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब, त्यांचे सगेसोयरे एकत्र येत असतात. मात्र या नात्यात काही वाद झाला आणि तो विकोपाला गेला, तर मात्र घटस्फोट हा एकमेव पर्याय उरतो. मात्र जगात भारतासह आणखी काही देश आहेत जिथे घटस्फोटांचं प्रमाण फारच कमी आहे. यादेशांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

गेल्या काही काळात झालेल्या भौतिक प्रगतीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनही झपाट्याने बदललं आहे. त्याचा परिणाम पती-पत्नीच्या नात्यावरही दिसून येत आहे. अनेक प्रगत देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, बदललेली जीवनशैली यामुळे घटस्फोटांचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. भारतातमध्येही हे प्रमाण कमालीचं वाढताना दिसत आहे. मात्र आजही कौटुंबिक आणि सामाजिक बंधनांमुळे वैवाहिक नातं टिकवण्याकडे जोडप्यांचा कल असल्याचं दिसून येतं.

खरं तर विवाहामुळे केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब, त्यांचे सगेसोयरे एकत्र येत असतात. मात्र या नात्यात काही वाद झाला आणि तो विकोपाला गेला, तर मात्र घटस्फोट हा एकमेव पर्याय उरतो. मात्र जगात भारतासह आणखी काही देश आहेत जिथे घटस्फोटांचं प्रमाण फारच कमी आहे. यादेशांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

एका रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये घटस्फोटांचं प्रमाण फार कमी आहे. त्याशिवाय आयर्लंड, कतार, यूएई आदि देशांमध्येही घटस्फोटांच प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेने कमी आहे.

या रिपोर्टनुसार जगात सर्वात कमी घटस्फोट होणाऱ्या देशांमध्ये आपल्या भारताशेजारील श्रीलंका या देशाचा पहिला क्रमांक लागतो. येथे दर हजार लोकांमागे केवळ ०.१५ टक्के घटस्फोट होतात. त्याखालोखाल व्हिएतनाम आणि ग्वाटेमाला या देशांचा दुसरा क्रमांक लागतो. तिथे घटस्फोटांचं प्रमाण हे दरहजारी ०.२ एवढंच आहे. त्यानंतर सेंट व्हिसेंट आणि ग्रेनाडाइन्स हे देश असून, घटस्फोटांचं प्रमाण दर हजारी ०.४ एवढंच आहे. धार्मिक श्रद्धा, प्रथा परंपरा आणि घटस्फोटाबाबत कठोर कायदे यामुळे इथे घटस्फोटांचं प्रमाण नगण्य आहे.

याउलट गुआम, मालदीव आणि ग्रीनलँडसारख्या देशांमध्ये घटस्फोटाचा दर खूपच अधिक आहे. येथील लोक वैवाहिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवन आणि आनंदाला प्राधान्य देतात. येथील कायदे घटस्फोट घेणाऱ्यांसाठी बऱ्यापैकी सुलभ आहेत.

हा अहवाल विविध देशांमधील कुटुंब व्यवस्था आणि जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाला दर्शवणारा आरसा आहे. त्यामधून त्या देशातील स्थिती दिसून येते.