शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: या आहेत जगातील टॉप १० लॅब, जिथे सुरू आहे कोरोनाच्या लसीवर संशोधन; भारतातील या संस्थांचाही आहे समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 7:49 AM

1 / 11
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग चिंतीत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर उपाय शोधण्यासाठी सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. जगातील काही संशोधन संस्थांना जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनावरील औषधाची चाचणी घेण्यासाठी परवानगीदेखील मिळाली आहे, अशाच काही आघाडीच्या संस्थांचा घेतलेला हा आढावा.
2 / 11
ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अॅस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड युनिव्हरिसिटीसोबत मिळून एक व्हॅक्सिन तयार करण्यासाठी काम करत आहे. या व्हॅक्सिनने प्रीक्लिनिकल आणि त्यानंतर तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणाऱ्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पार केला आहे. तसेच दोन वेगवेगळ्या ठिकाणी या व्हॅक्सिनबाबत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील संशोधन सुरू आहे. जर सर्व व्यवस्थित झाल्यास या संशोधनामधून कोरोनाविरोधातील आपातकालिन व्हॅक्सिन ऑक्टोबर महिन्यापर्यंत प्राप्त होऊ शकते.
3 / 11
अमेरिकन कंपनी असलेल्या मॉडर्नाच्या कोरोनावरील व्हॅक्सिनची चाचणी दुसऱ्या टप्प्यात आली आहे. आता जुलै महिन्यात ही व्हॅक्सिन चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करू शकते. या चाचणीमध्ये कमी लोकांना सहभागी करून घेण्यावरून काही वाद झाले आहेत. तरीही या चाचणीचे परिक्षण निर्विरोधपणे चालू आहे. २०२१ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये आपण लस उपलब्ध करू अशी कंपनीला आशा आहे.
4 / 11
जर्मन कंपनी बायोएंटेक, अमेरिकन कंपनी फायझर आणि चिनी कंपनी फोर्सून फार्मा यांनी ही लस विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. या व्हॅक्सिनची चाचणीसुद्धा दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. ही लस ऑक्टोबर महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
5 / 11
लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्येही संशोधकांकडून एका व्हॅक्सिनवर संशोधन सुरू आहे. याच्या उत्पादनासाठी त्यांनी मॉर्निंगसाइड व्हेंचर्स आणि वितरणासाठी व्हॅक एक्विटी ग्लोबल हेल्थ नावाच्या कंपनीसोबत करार केला आहे. या लसीचीसुद्धा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
6 / 11
जपानी कंपनी एंजेस ओसाका विद्यापीठ आणि तकारा बायो या अजून एका कंपनीसोबत मिळून एक व्हॅक्सिन तयार करत असून, याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
7 / 11
एक अजून अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्ससुद्धा व्हॅक्सिन तयार करण्यासाठी काम करत आहे. काही ठिकाणी या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. या संशोधन प्रकल्पामध्ये ३८.४ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे.
8 / 11
वुहान इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट आणि चीनची सरकारी कंपनी सिनोफार्मा मिळून एका लसीवर काम करत आहेत. या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
9 / 11
चायनिज अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सच्या इंस्टिट्युट ऑफ मेडिकल बायोलॉजी येथेही एका लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. या इंस्टिट्युटनेच पोलिओ आणि हेपॅटायटिस ए या आजारावरील लसी विकसित केल्या होत्या.
10 / 11
चीनमधील खासगी कंपनी असलेली सिनोव्हॅक बायोटेक चीन आणि ब्राझीलमध्ये एका व्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तसेच या लसीचे दरसाल दहा कोटी डोस तयार करण्यासाठी कंपनीकडून एका फॅक्टरीची बांधणीही सुरू आहे.
11 / 11
भारतीय कंपनी भारत बायोटेकला सरकारी संस्था असलेल्या आयसीएमआरसोबत मिळून विकसित करत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच अजून एक भारतीय कंपनी जाइडस कॅडिला हिलाही त्यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याची परवानगी मिळाली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयMedicalवैद्यकीयHealthआरोग्य