Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 09:08 AM2020-04-23T09:08:30+5:302020-04-23T09:26:25+5:30

Coronavirus : कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

चीनच्या वुहानमधून वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाने आतापर्यंत तब्बल 184,217 लोकांचा बळी घेतला आहे.

जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.

कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिका, इटली, स्पेनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यात चीन यशस्वी झाला असून तेथील मृतांची संख्याही कमी झाली आहे.

कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये तब्बल 2 महिन्यांनी पुन्हा एकदा व्हायरसची लक्षण दिसत असल्याने चीनच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. 2 महिन्यांनंतरही कोरोना व्हायरस शरीरात जिवंत असल्याचं दिसून येत आहे.

वुहानमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसून येत आहे. अशा रुग्णांना वुहानमधील एका इंडस्ट्रियल प्लान्टजवळ तयार केलेल्या क्वारंटाइन हबमध्ये ठेवण्यात आले आहे.

रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. मात्र यापैकी एका रुग्णाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आला होता. तेव्हा त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोना संसर्ग होऊन रुग्णाला 2 महिने झाले आहेत. ठीक झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चीनमध्ये आता अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामध्ये बरा झालेला रुग्ण 50 ते 60 दिवसांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह होत असल्याचं दिसत आहे.

चीनने कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले असले तरी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, चीन, इराण, तुर्की, बेल्जियम, ब्राझिल, कॅनडा, नेदरलँड, स्वित्झर्लंड, रशिया, पोर्तुगाल, आयर्लंड आणि भारतातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.