शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : "फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवांवर हल्ला करतो कोरोना"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 11:17 AM

1 / 16
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 16
कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशात गंभीर परिस्थिती असून व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. योग्य ती काळजी घेतली जात आहे.
3 / 16
कोरोनावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. जगभरात यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. कोरोनाबाबतची नवनवीन माहिती ही संशोधनातून समोर येत आहे.
4 / 16
कोरोना व्हायरस हा शरीरात प्रवेश केल्यावर फुफ्फुसांवर हल्ला करतो असं म्हटलं जातं. मात्र याबाबत आता एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
5 / 16
रिसर्चमधून डॉक्टरांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना अधिकाधिक धोकादायक होत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.
6 / 16
कोरोनाचा व्हायरस फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वासोच्छवासात समस्या निर्माण होते. मात्र आता कोरोना संपूर्ण शरीरावर हल्ला करतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
7 / 16
कोरोना फुफ्फुसासोबतच किडनी, लिव्हर, हृदय, मेंदू, त्वचा आणि नर्व्हस सिस्टिमवरही हल्ला करतो अशी चिंताजनक माहिती समोर आली आहे.
8 / 16
कोलंबिया विद्यापीठाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर ही माहिती दिली आहे. कोरोना वायरस शरीरातील महत्त्वाच्या घटकांवर हल्ला करत असल्याचं म्हटलं आहे.
9 / 16
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडचणी येतात. मात्र आता कोरोना शरीरावरही परिणाम करत असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
10 / 16
मधूमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, हृदयासंबंधी समस्या असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोक अधिक असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यामुळे या व्यक्तींनी काळजी घेणं आवश्यक आहे.
11 / 16
कोरोना व्हायरस शरीरातील मुख्य कार्यप्रणालीवरच हल्ला करतो. महत्त्वाच्या अवयवाचं नुकसान करतो. यामुळे अनेक शारीरीक समस्या निर्माण होतात.
12 / 16
डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे, पोटदुखी, खोकला आणि ताप यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. कोरोना रुग्णांमध्ये ही लक्षण आढळून येत आहेत.
13 / 16
कोरोनाचा धोका ही दिवसागणिक वाढत आहे. तसेच वेगाने यावर संशोधन सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 16
काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे मेंदूशी संबंधित विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो, अशी धोक्याची सूचना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील (यूएलसी) संशोधकांनी दिली.
15 / 16
यूएलसीमधील संशोधकांनी 43 कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या रुग्णांना स्ट्रोक, मेंदू आणि मज्जातंतूंच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.
16 / 16
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 8,49,553 वर गेली आहे. तर आतापर्यंत तब्बल 22,674 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य