Corona Virus : धोक्याची घंटा? कोरोनाच्या 'या' नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा वाढलं टेन्शन; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:35 AM2023-07-29T11:35:58+5:302023-07-29T11:57:11+5:30

Corona Virus : कोरोना व्हायरसचा एक व्हेरिएंट समोर आला आहे, जो प्रसाराच्या बाबतीत ओमायक्रॉनपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे.

संपूर्ण जगातून कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. वेगाने पसरणारे त्याचे नवनवीन व्हेरिएंट पुन्हा जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. याच दरम्यान, इंडोनेशियामध्ये कोरोना व्हायरसचा एक व्हेरिएंट समोर आला आहे, जो प्रसाराच्या बाबतीत ओमायक्रॉनपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे.

हा व्हेरिएंट आतापर्यंत 110 पेक्षा जास्त वेळा म्युटेड झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, इंडोनेशियामध्ये दिसणारा हा व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वात म्यूटेड व्हेरिएंट आहे. जकार्ता येथील एका रुग्णाच्या स्वॅबमध्ये डेल्टा व्हेरिएंटचं मॉर्फ डेल्टा व्हर्जन आढळून आलं. तो किमान 113 वेळा म्यूटेट झाला आहे.

संशोधकांनी सांगितले की हे आतापर्यंतचा सर्वात धोकादायक कोविड व्हेरिएंट असू शकते. या प्रकाराच्या तुलनेत, ओमायक्रॉनचे केवळ 50 वेळा म्यूटेड झाला आहे. त्याच वेळी, शास्त्रज्ञांनी सांगितले की तो संपेल असा कोणताही पुरावा आतापर्यंत सापडला नाही.

या धोकादायक व्हेरिएंट संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्याचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता नाही. ज्या रुग्णामध्ये हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. तो एका नवीन संसर्गाशी लढत होता.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवीन व्हायरसच्या नोंदी इंटरनॅशनल डेटाबेसवर अपलोड करण्यात आल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला या नवीन व्हेरिएंटची लागण झाली, तर त्याला बरे होण्यासाठी जवळपास एक महिना लागू शकतो.

कोविडच्या या व्हेरिएंटमुळे लोकांची इम्युनिटी खूपच कमकुवत होते. याबाबत शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. एड्स किंवा कॅन्सपच्या रुग्णाला या व्हेरिएंटमुळे संसर्ग झाल्यास. त्यांना उपचारात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

वारविक विद्यापीठातील वायरोलॉजिस्ट प्रोफेसर लॉरेन्स यंग म्हणाले की, नव्याने सापडलेल्या स्ट्रेनमध्ये प्रसार होण्याची आणि इतरांना संक्रमित करण्याची क्षमता आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रोफेसर यंग म्हणाले की, या नवीन व्हेरिएंटबाबत निष्काळजीपणा बाळगू नये. याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

संपूर्ण जगाने कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना केला. अद्यापही काही देशात रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून खबरदारीचे उपाय करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.