'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:27 PM2024-05-23T14:27:48+5:302024-05-23T14:29:36+5:30

loksabha Election - लोकसभा निवडणुकीत आता शेवटचे २ टप्पे उरले आहेत. त्यात उत्तर प्रदेशातील जागांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात यंदा कोण बाजी मारणार यावर विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

Lok Sabha Elections - 31 out of 80 seats in Uttar Pradesh had less votes in the last election, direct fight between BJP-Congress- Samajwadi Party-BSP | 'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?

'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?

लखनौ - दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. यामागचं मुख्य कारण म्हणजे देशातील सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघात या राज्यात आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत हे नेते यूपीतून विजयी होत देशाचे पंतप्रधान बनले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वातील इंडिया आघाडीनं उत्तर प्रदेशात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यूपीमध्ये यंदा काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशात २५ हून अधिक अशा जागा आहेत ज्यावर देशाची सत्ता अवलंबून आहे. या जागांवर काही उलटफेर झाला तर २०२४ च्या निवडणुकीतील भाजपाचं राजकीय गणित बिघडू शकतं. उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३१ जागा अशा आहेत जिथं २०१९ च्या निवडणुकीत विजय आणि पराभव यांच्यातील अंतर १ लाख अथवा त्याहून कमी मतांचं आहे. या जागा इकडे तिकडे गेल्या तर गणित बिघडेल कारण लोकसभा निवडणुकीत १ लाखाहून कमी मताधिक्य जास्त नसते. यूपीत सध्या इंडियाविरुद्ध एनडी आणि मायावती यांची बसपा अशी तिरंगी लढत दिसतेय. 

२०१९ च्या यूपीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ६४ जागा जिंकल्या होत्या तर सपा ५, बसपा १० आणि काँग्रेसनं १ जागेवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकीचं विश्लेषण केले तर ३१ जागांवरील अंतर १ लाख आणि त्याहून कमी होते. या ३१ जागांपैकी २२ जागांवर भाजपाचा कब्जा आहे. तर ६ जागा बसपा, २ सपा आणि एक जागा अपना दलनं जिंकली होती. जर या जागांवरील मतदारांनी बदलाची भूमिका निभावली तर भाजपासाठी सर्वात जास्त अडचण निर्माण होऊ शकते आणि मायावती यांच्यासाठीही टेन्शनचं ठरू शकते. 

मागील लोकसभा निवडणुकीत कमी मताधिक्या असलेल्या ४ जागा अशा आहेत जिथेत १० हजारांहून कमी अंतर पहिल्या २ उमेदवारांमध्ये आहे. ज्यातील २ जागा ५ हजारांपेक्षा कमी मताधिक्य आहे. त्याशिवाय ५ जागा ज्यावर मताधिक्य १० ते २० हजारांमध्ये आहे. लोकसभेच्या ७ जागा अशा ज्यात मताधिक्य २० ते ५० हजारांमध्ये आहे. त्याशिवाय १५ जागांवर मताधिक्य ५० हजार ते १ लाखांपर्यंत आहे. 

सपा-काँग्रेस भाजपाचा खेळ बिघडवणार?

मोदी लाटेवर स्वार भाजपाला २०१४ च्या निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा मिळाल्या होत्या तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा आघाडी असूनही भाजपाला ६२ जागांवर विजय मिळाला होता. दोन्ही निवडणुकीत भाजपानं त्यांच्या मित्रपक्षाला २-२ जागा दिल्या होत्या. मागील २ निवडणुकीत विरोधी पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. परंतु यंदा काँग्रेस आणि समाजवादी पक्ष रिंगणात उतरला आहे. अखिलेश यादवनं मुस्लीम-यादव समीकरण पुढे आणलं आहे. इतकेच नाही तर निवडणुकीत गैरयादव ओबीसीवर सपा-काँग्रेसची नजर आहे. ज्यातून भाजपाच्या पारंपारिक मतांमध्ये फूट पडली जाईल असा डाव आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला किती जागा मिळतात त्यावर त्यांच्या अबकी बार ४०० पारचं भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Lok Sabha Elections - 31 out of 80 seats in Uttar Pradesh had less votes in the last election, direct fight between BJP-Congress- Samajwadi Party-BSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.