Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:04 PM2024-05-23T15:04:59+5:302024-05-23T15:05:27+5:30

Domestic Violence Video, Wife beats Husband: व्हिडिओमध्ये असे दिसून येते की पती संपूर्ण वेळ शांतपणे मारहाण सहन करतो आणि काहीही न बोलता गप्प राहतो.

Husband Wife Viral Video as husband beaten by wife with kicks CCTV footage is goes viral on social media | Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल

Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल

Domestic Violence Video, Wife beats Husband: सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की एक माणूस ऑफिसमधून घरी परतत आहे. तो हेल्मेट काढणारच असतो इतक्यात त्याची पत्नीने त्याच्यावर जोरदार हल्ला करते. ती त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की पती संपूर्ण वेळ शांतपणे मारहाण सहन करतो आणि काहीही न बोलता गप्प राहतो.

@cctvidiots हँडलवर व्हिडिओ शेअर करताना युजरने दावा केला आहे की, 'पती 14 तासांच्या शिफ्टमध्ये काम करून ऑफिसमधून घरी परतला. तो कचऱ्याची विल्हेवाट लावायला विसरल्याने संतापलेल्या पत्नीने त्याला बेदम मारहाण केली. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज गेल्या वर्षी २९ जानेवारीचे असल्याचे समोर आले आहे. म्हणजे घटना त्याच दिवशी घडली. मात्र हा व्हिडीओ कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही. पाहा व्हिडीओ-

सोशल साईट X वर शेअर केलेल्या या 20 सेकंदाच्या फुटेजने इंटरनेटवर नव्या वादाला तोंड फोडले आहे. लोक म्हणतात की घरगुती हिंसा ही एक गंभीर समस्या आहे. सामान्यतः केवळ महिलाच याच्या बळी ठरतात. पण व्हायरल फुटेज पाहून असे म्हणता येईल की पुरुषही अशा हिंसाचाराला बळी पडतात. एका यूजरने लिहिले आहे की, लोक पुरुषांची खिल्ली उडवतील या विचाराने तक्रार करत नाहीत. पण सत्य हे आहे की पुरुषही घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. तर दुसरा युजर म्हणाला की, कचरा विसरण्याच्या बाबतीत किती तथ्य आहे हे माहित नाही, परंतु व्हिडिओवरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की हा पुरुष घरगुती हिंसाचाराचा बळी आहे.

Web Title: Husband Wife Viral Video as husband beaten by wife with kicks CCTV footage is goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.