श्रेया बुगडेचा परफेक्ट लूक; विदेशी रंगात रंगून गेली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:03 PM2024-05-23T13:03:06+5:302024-05-23T13:10:15+5:30

Shreya bugade: सध्या श्रेया लंडनला तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे. येथील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.

श्रेयाने चला हवा येऊ द्या व्यतिरिक्त काही गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

कलाविश्वासह सोशल मीडियावरही तिचा दांडगा वावर आहे. वरचेवर ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

श्रेया अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी व्यवसायिकादेखील आहे. तिचं स्वत:चं दादरमध्ये रेस्टॉरंट आहे.

सध्या श्रेया लंडनला तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे. येथील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विदेशात जाऊन श्रेया तिथल्या रंगात रंगून गेली आहे. तिचे फोटो पाहून याचा अंदाज येतो.

ब्ल्यू कलरचा क्रॉप टॉप आणि फॉर्मल ट्राऊझर परिधान केली आहे. सोबतच क्लासी गॉगल आणि मोकळे केस असा परफेक्ट लूक तिने केला आहे.

श्रेयाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

श्रेया सुद्धा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा कायम प्रयत्न करत असते.