शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनचे प्रयोग थांबेनात! कोरोनाला रोखण्यासाठी आखतोय अजब योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 12:48 PM

1 / 10
जगात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू चीनमधून पसरला. त्यामुळे चीन जगभरातून टीका झाली.
2 / 10
वटवाघळाच्या माध्यमातून कोरोना माणसाच्या शरीरात पोहोचल्याचं म्हटलं जातं. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी खाल्ले जातात. त्यामुळे यावरुनही चीनला लक्ष्य करण्यात आलं.
3 / 10
कोरोनामुळे टीकेचा धनी ठरलेल्या चीननं आता त्याच कोरोनाच्या औषधावर काम सुरू केलं आहे.
4 / 10
जंगली जीव जंतूंपासून तयार करण्यात आलेल्या औषधांचा वापर करण्याचे आदेश चीन सरकारनं डॉक्टरांना दिले आहेत.
5 / 10
यातील एका औषधात अस्वलाच्या पित्ताशयातल्या एका तरल पदार्थाचा समावेश आहे. याशिवाय बकरीची शिंगं आणि तीन प्रकारच्या रोपांचाही समावेश आहे.
6 / 10
प्राण्यांच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्था, संघटनांनी चीनच्या सरकारच्या या आदेशावर टीकेची झोड उठवली आहे.
7 / 10
गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना अस्वलाच्या पित्ताशयातल्या पदार्थाचा समावेश असलेलं औषध देण्यात यावं, अशी शिफारस चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिले आहेत.
8 / 10
चीन आणि व्हिएतनाममध्ये जवळपास १२ हजार अस्वलांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे.
9 / 10
जिवंत प्राण्यांना खाण्याची आणि त्यांच्यापासून औषधं तयार करण्याचं काम चीनमधून हजारो वर्षांपासून सुरू आहे.
10 / 10
प्राण्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये उपचार करण्याची क्षमता असते. त्यामुळेच चीनच्या अनेक भागांमध्ये प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला जातो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन