पाणावलेले डोळे, हातात मृतदेह, चेहऱ्यावर दुःख आणि राग...; विध्वंसाचे थरकाप उडवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:45 AM2023-10-10T11:45:53+5:302023-10-10T11:55:13+5:30

Israel-Hamas conflict: इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डोळ्यात भीती दिसते. दु:ख आणि संतापही व्यक्त होत आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिक आणि नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. तसेच अपहरण देखील केलं आहे. आता हमासने धमकी दिली आहे की, जेव्हा जेव्हा इस्त्रायल पॅलेस्टाईन लोकांच्या घरावर कोणतीही पूर्वसूचना न देता बॉम्बस्फोट करेल तेव्हा ते एका इस्रायली व्यक्तीला ठार करतील

इस्रायलने गाझा पट्टीला घेरण्यासाठी मोठी रणनीती तयार केली आहे. येथे नाकाबंदी करण्यात आली आहे, त्यामुळे इस्रायल आता आकाशातून जमिनीवर हल्ला करण्याचा विचार करत असल्याची भीती वाढली आहे. यामध्ये 1500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दक्षिण गाझा पट्टीतील राफा निर्वासित छावणीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी लोक शोक करण्यासाठी आले होते. कुटुंबीयांनी मृतदेह सोबत नेले. (फोटो- एपी)

इस्रायलच्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डोळ्यात भीती दिसते. दु:ख आणि संतापही व्यक्त होत आहे. येथे लोक स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्याचा खूप प्रयत्न करत आहेत.

उत्तर गाझा पट्टीतील जबलिया निर्वासित छावणीवर इस्रायली हवाई हल्ला करण्यात आला. पॅलेस्टिनी बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. (फोटो रॉयटर्स)

गाझा पट्टी परिसरात लोक आपल्या घरात लपून बसले आहेत. बाहेर गेल्यास जीव गमावण्याचा धोका वाढला आहे. इथे लहान मुलंही घाबरलेली दिसतात. कुटुंबातील सदस्य सुरक्षित ठिकाणांच्या शोधात आहेत.

गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईचा चिमुकला जखमी झाला. डॉक्टरांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेत नेऊन प्राथमिक उपचार केले. (फोटो- रॉयटर्स)

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून इस्त्रायली हवाई हल्ल्यात किमान पॅलेस्टाईचे 687 जण ठार झाले आहेत आणि 3,726 जखमी झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्स आणि साक्षीदारांच्या मते, गाझा पट्टीमध्ये हल्ले झालेल्या ठिकाणी अपार्टमेंट ब्लॉक, एक मशीद आणि एक हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या हल्ल्यात रस्ते आणि घरेही उद्ध्वस्त झाली आहेत.

इस्रायलने एका खासगी पॅलेस्टाईन टेलिकम्युनिकेशन कंपनीच्या मुख्यालयावरही बॉम्बफेक करून लँडलाइन टेलिफोन, इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा खंडित केली.

इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही गाझा पट्टीला जमीन आणि आकाशातून लक्ष्य केले, त्यात शस्त्रास्त्र डेपोचाही समावेश होता. हे गाझाच्या किनारपट्टीवरील इस्लामिक जिहाद आणि हमासच्या तळाशी संबंधित होते.

इस्रायलचे म्हणणे आहे की, गाझा पट्टीवरील वेढलेल्या भागात हवाई बॉम्बफेक करण्यात आली आहे. हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की ते अन्न आणि इंधनाच्या प्रवेशावर बंदीसह गाझाची संपूर्ण नाकेबंदी लागू करेल.

इस्रायली टीव्ही चॅनल्सने हमासच्या हल्ल्यातील मृतांची संख्या 900 वर पोहोचल्याचे सांगितले. सुमारे 2,600 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश इस्रायली तरुणांचा समावेश आहे.

हमासचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायलींना ठार मारण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, एखाद्या नागरिकाच्या घरावर कोणतीही पूर्वसूचना न देता बॉम्बफेक केल्यास हमास एका इस्रायलीला फाशी देईल आणि व्हिडीओ जारी करेल. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.