'हा' आहे जगातील सर्वात महागडा देश; हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे २५ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:14 PM2023-07-17T15:14:48+5:302023-07-17T15:25:06+5:30

पर्यटकांना येथे राहणे आणि खरेदी करणे खूप महाग आहे.

नुकताच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सचा एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये जगातील सर्वात महागड्या देशांबद्दल सांगितले आहे. अनेकांना वाटत असेल की जगातील सर्वात महाग देश अमेरिका किंवा ब्रिटन असतील. मात्र, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार ते चुकीचे सिद्ध झाले आहे.

कारण बर्म्युडा हा जगातील सर्वात महाग देश आहे. बर्म्युडा आणि स्वित्झर्लंड हे जगातील सर्वात महागडे देश आहेत, असा दावा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालात करण्यात आला आहे. १४० देशांच्या या अहवालानुसार बर्म्युडामध्ये राहण्याची किंमत खूप जास्त आहे.

या अहवालात स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर इंग्लंड, यूके, जपान आणि रशियाच्या तुलनेत अमेरिकेत राहणे खूपच स्वस्त आहे. बर्म्युडा हे उत्तर अटलांटिक महासागरात स्थित एक बेट आहे.

हा ब्रिटनचा ओव्हरसीज टेरिटरी आहे आणि त्याचे सौंदर्य आणि सागरी वातावरण पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांकडे आकर्षित करतात. त्यामुळे येथे शेती होत नाही आणि जीवनावश्यक वस्तू इतर देशांतून आयात केल्या जातात. बहुतेक सामग्री अमेरिकेतून आयात केली जाते. ज्यामुळे वाहतूक खर्च, कस्टम ड्युटी आणि मजुरी यामुळे येथील वस्तू महाग होतात.

बर्म्युडामध्ये राहणाऱ्या लोकांना इतर देशांच्या तुलनेत अनेक पट किंमत मोजावी लागते. याशिवाय, या देशात राहणे, जेवण, विमा आणि इतर खर्च इतर देशांच्या तुलनेत अधिक आहेत. या वस्तूंवर विक्रीकर आकारला जात असल्याने पर्यटकांना येथे राहणे आणि खरेदी करणे खूप महाग आहे.

याशिवाय, बर्म्युडामधील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार देखील खूप महाग आहेत. येथील हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे सरासरी भाडे सुमारे २५ हजार रुपये आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे बर्म्युडामध्ये राहणाऱ्या लोकांना इतर देशांच्या तुलनेत जास्त पगार मिळतो. त्यामुळे येथील लोकांच्या उत्पन्नावर आणि पगारावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे.

अहवालानुसार बर्म्युडा, स्वित्झर्लंड, केमन आयलँड, बहामास, आइसलँड, सिंगापूर, बार्बाडोस, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील टॉप १० महागडे देश आहेत. पाकिस्तान जगातील सर्वात स्वस्त शहरांपैकी एक आहे, तर भारत १३८ व्या क्रमांकावर आहे. ही यादी दरवर्षी बदलते आणि त्यानुसार पाकिस्तान १४० व्या तर भारत १३८ व्या क्रमांकावर आहे.